धुळे जिल्ह्यातील मानव विकासच्या २८ बसमध्ये  जीपीएस यंत्रणा कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 04:19 PM2018-07-20T16:19:35+5:302018-07-20T16:21:19+5:30

विद्यार्थी, पालक, व शाळांना समजेल   बसची सद्यस्थिती

The GPS system is implemented in 28 buses of human development in Dhule district | धुळे जिल्ह्यातील मानव विकासच्या २८ बसमध्ये  जीपीएस यंत्रणा कार्यान्वित

धुळे जिल्ह्यातील मानव विकासच्या २८ बसमध्ये  जीपीएस यंत्रणा कार्यान्वित

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात मानव विकासच्या ५० गाड्या धावतातत्यापैकी २८ बसमध्ये जीपीएस यंत्रणा बसविलीया यंत्रणेमुळे बसची सद्यस्थिती समजणार

आॅनलाइन लोकमत
धुळे : मानव विकास कार्यक्रमांतर्गत धुळे जिल्ह्यात पुरविण्यात आलेल्या एकूण २८ बसेसला जिल्हाधिकारी तथा जिल्हा मानव विकास समितीचे अध्यक्ष राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून नुकतीच जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे बसची सद्यस्थिती नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे.
 मानव विकास कार्यक्रमातून ग्रामीण भागातील मुलींकरीता मोफत बस सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या बस जिल्ह्यातील विविध मार्गांवर धावतात. बसची सद्य:स्थिती जाणून घेण्याच्या उद्देशाने या बसमध्ये जीपीएस सयंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे. विविध मार्गावर चालविण्यात येणाºया  बसची माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे जिल्ह्यातील आगार व्यवस्थापक, शिक्षणाधिकारी, विद्यार्थी, पालक व शाळेला याद्वारे मिळू शकणार आहे. तसेच जीपीएस सयंत्राच्या माध्यमातून बसची सद्य:स्थिती, बसने केलेले मार्गक्रमण याद्वारे सर्व नागरिकांना पाहावयास मिळणार आहे.
बसची माहिती जाणून घेण्यासाठी कोणत्याही इंटरनेट ब्राऊजरमध्ये संबंधित  लिंक उघडून यूजर नेम  व पासवर्डच्या मदतीने बसची माहिती कोणत्याही संगणक, लॅपटॉप किंवा मोबाईलवर इंटरनेट ब्राऊजरच्या साहाय्याने पाहू शकतात.  ही प्रणाली सर्वसामान्य नागरिकांकरीता मोफत सुरू करण्यात आली आहे. शिक्षण विभागासह अधिकाधिक विद्यार्थी, पालक, शाळा प्रशासन व नागरिकांनी जीपीएस प्रणालीद्वारे मिळणाºया माहितीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी  रेखावार यांनी केले आहे. 

या बसेसमध्ये काही बिघाड झाल्यास ज्या आगाराच्या बसमध्ये बिघाड झाला आहे त्या आगारामार्फत तात्पुरत्या स्वरुपात चालविण्यात येणाºया सात बसेसची सद्य:स्थिती शिवाय प्रत्येक आगाराकडे पुरविण्यात आलेल्या अतिरिक्त यंत्रणांद्वारे आठव्या व नवव्या क्रमांकावर तात्पुरत्या स्वरुपात चालविण्यात येणाºया  बस पाहता येतील. यात उदा. दोंडाईचा आगाराकरीता दोंडाईचा-१, दोंडाईचा-२ तर साक्री आगारासाठी साक्री१, साक्री२ अशा स्वरुपात प्रत्येक आगाराच्या बसची नावे दिसतील. 


 

Web Title: The GPS system is implemented in 28 buses of human development in Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.