मुंबईकडे जाणाऱ्या लक्झरी बसमधून मांस हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 10:14 PM2019-09-20T22:14:00+5:302019-09-20T22:14:51+5:30
टोलनाक्याजवळील कारवाई : सुटकेसमध्ये लपविलेले शोधून काढले; गरोक्षकांची जागरूकता
धुळे : एका लक्झरी बसमधून मांस मुंबईच्या दिशेने नेले जाणार असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली़ त्यानुसार लळींग टोलनाक्यावर सापळा लावून बसची तपासणी करण्यात आली असता एका सुटकेसमध्ये ९ हजार २०० रुपये किंमतीचे मांस आढळून आले़ ते मोहाडी पोलिसांच्या मदतीने जप्त करण्यात आले असून एकाविरुध्द गुन्हा दाखल झाला़
धुळ्यातील एका लक्झरी बसमधून सुटकेसच्या माध्यमातून मांस मुंबईच्या दिशेने जात असल्याची माहिती संजय शर्मा यांच्यासह गोरक्षकांना मिळाली होती़ त्यानुसार, संजय शर्मा, विकास गोमसाळे, प्रणील मंडलिक, कुणाल बोरसे, निलेश सपकाळ, राकेश ढिवरे, हर्षल गुरव, कुणाल घाटोळे, टिनू मोहिते आदींनी गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील लळींग टोलनाका परिसरात पाळत ठेवली होती़
रात्री दहा वाजेच्या सुमारास एमएच १८ बीजी ३६१८ क्रमांकाची लक्झरी बस येताच गोरक्षकांनी ही बस थांबविली़ बसमधून मांस नेले जात असल्याचे सांगून तपासणी करण्याची मागणी केली़ यावेळी मोहाडी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना देखील पाचारण करण्यात आले होते़ पोलिसांनी बसमधील एका सीटवर ठेवलेल्या दोन मोठ्या सुटकेसची तपासणी केली असता त्यात जनावरांचे मांस आढळून आले़ परिणामी ही लक्झरी बस मोहाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आली़ याप्रकरणी संजय रामेश्वर शर्मा (५०, रा़ आग्रा रोड, धुळे) यांनी फिर्याद दिली़ त्यानुसार, संशयित फकीर मोहम्मद खाटीक (६०, रा़ मच्छीबाजार, धुळे) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला़ घटनेची माहिती मिळताच संशयिताचे नातेवाईकांसह उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, सहायक पोलीस निरीक्षक व्ही़ एऩ ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक एस़ पी़ गायकवाड आदींनी पोलीस ठाण्यात येऊन माहिती संकलित केली़ मांस हे बकºयाचे असल्याचे सांगितले जात असल्यामुळे नेमके मांस कोणत्या जनावरांचे आहे याची तपासणी करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाºयास पाचारण करण्यात आले़ तपासणीत मांस हे जनावराचे असल्याचे स्पष्ट झाल्याने फकीर खाटीक या संशयिताविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला़ दरम्यान, मुंबईकडे जाणारे प्रवासी या कारवाईमुळे चांगलेच खोळंबले होते़ सुटकेस उतरवून बस मार्गस्थ करावी अशी मागणी प्रवाश्यांची होती़ परंतु बस सोडणार नसल्याची भूमिका पोलिसांची होती़ अखेर, दुसरी बस बोलावून प्रवासी मुंबईकडे मार्गस्थ करण्यात आले़