भगवान महावीर जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:13 PM2019-04-18T12:13:31+5:302019-04-18T12:14:59+5:30
भगवान महावीर जयंतीनिमित्त शहरातुन काढण्यात आलेली शोभायात्रेत सहभागी समाजबांधव़
धुळे : जन्मकल्याणक महोत्सव, नवकार मंडल संघटनासह सकल जैन समाजातर्फे भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली़ यावेळी मतदान जनजागृती शिबिरातून प्रबोधन करण्यात आले होते़
शहरातील ग़नं़ २ मधील शितलनाथ जैन मंदिर येथून सकाळी काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रा सकल जैन समाज सहभागी झाला होता़ या शोभायात्रेत चांदीच्या रथात भगवान महावीरांच्या मुर्ती विराजमान होती़ जैन धर्मातील सर्व पुरूष, महिला, तरूण, तरूणी उत्साह दिसुन आला़ शहरातील मुख्य बाजार पेठेसह प्रमुख मार्गात जैन सोशल गृपतर्फे शीतपेयची ठिक-ठिकाणी व्यवस्था करण्यात आले.
निवडणूक आयोग व जैन सोशल गृपतर्फे यंदा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदाता जनजागृती अभियान राबविण्यात आले़ यावेळी नवीन तंत्रज्ञानाने ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या सहाय्याने मतदान करण्यासाठीचे मॉडेलच्या सहाय्याने उपस्थित नागरिकांना प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले़ यावेळी घोषणा व फलकासह सेल्फी पोइंटची व्यवस्था करण्यात आली होती़ या नाविन्यपूर्ण उपक्रमाला जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी भेट देऊन उपस्थित जैन समुदायाला निर्भीडपणे व बहुसंख्येने मतदान करण्याचे आवाहन केले़
शिंदखेडयात रक्तदान
भारतीय जैन संघटना शाखेतर्फे भगवान महावीर जयंती निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी ४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. येथील बसस्थानकासमोर शिबीर घेण्यात आले़. सकाळी ९ ते २ या वेळेत रक्तदान झाले. या शिबिरात एन. डी. मराठे शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रथम रक्तदान करुन शिबिराचे उघाटन केले़ येथील अर्पण रक्तपेढीचे डॉ़ भारत पवार, प्रशांत राजपूत, निवृती भदाने हर्षदा पिंगले, प्रियंका सावळे, शिवानी जयस्वाल यांनी सहकार्य केले. बिजासणी मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात इंदुर येथील राकेश जैन यांनी मार्गदर्शन केले़ सुमित जैन स्वाध्वी पियूषाजी,पदमिनीजी यांचे व्याख्यान झाले़ यावेळी गायन, स्पर्धा घेण्यात आली़ कार्यक्रमात भारतीय जैन संगटनेचे विभागीय कार्यध्यक्ष प्रा.चंद्रकांत डागा, शहर अध्यक्ष भगचंद कर्नावट, सचिव हितेंद्र जैन, उपाध्यक्ष विजय बोथरा, मयूर ओस्तवाल, सुमित जैन, अक्षय बाफना, अशोक राखेचा, रविंद्र कवाड आदी उपस्थित होते़
पिंपळनेर येथे सामुहिक शपथ
येथे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शंभर टक्के मतदानाचा हक्क बजाविण्याची शपथ घेण्यात आली. येथील राजस्थान पंच मंडळ, श्री जैन संघ व नवयुवक मंडळातर्फे बुधवारी महावीर जयंती निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली़ बाजार पेठ येथून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत सकल जैन समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता़
भगवान महावीर यांची प्रतिमा रथावर ठेऊन भव्य शोभायात्रा बाजार, खोल गल्ली बसस्थानक, सटाणा रोड मार्गे महावीर भवनपर्यत काढण्यात आली़ कार्यक्रमात भगवान महावीर यांचे विचार व कार्यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले़