पाणीटंचाई निवारणासाठी १ कोटी ४५ लाखांचा निधी मंजूर!
By Admin | Published: March 9, 2017 12:57 AM2017-03-09T00:57:07+5:302017-03-09T00:57:07+5:30
जयकुमार रावल यांचा पाठपुरावा : २५ टक्के गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती
दोंडाईचा : जिल्ह्यात जवळपास २५ टक्के गावांना पाणीटंचाईची झळ बसली आहे. जिल्ह्यातील ही विदारक परिस्थिती विचारात घेता, राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी टंचाई निवारणासाठी शासनाकडे पाठपुरावा करून १४५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे.
जिल्हा प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून दुष्काळग्रस्त भागात टॅँकर सुरू केले होते. परंतु, निधी नसल्याने प्रशासनाने काही दुष्काळग्रस्त भागात टॅँकर सोडणे बंद केले. ही विदारक परिस्थिती विचारात घेता, राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी शासनाकडे पाठपुरावा केला.
उन्हाची दाहकता जाणवू लागलेली असताना धुळे जिल्ह्यातील बहुतांश गावातील लोकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. शासनाने १४५ लाखांचा निधी मंजूर केल्यानंतर याबाबत नाशिक विभागीय आयुक्तांना शासनाचे नुकतेच आदेश प्राप्त झाले आहे.
विविध उपाययोजना करण्याच्या सूचना
जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या निधीअंतर्गत ज्या भागात दुष्काळी परिस्थिती आहे, त्या भागात टॅँकर सोडण्यात येणार असून, विहिरीही अधिग्रहीत केल्या जाणार आहेत. तसेच ही टंचाई निवारण्यासाठी आवश्यक ती कामे केली जाणार असून या टंचाईतून मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे आदेश मंत्री रावल यांनी दिले आहेत. त्यामुळे दुष्काळ निवारणासाठी दिलासा मिळणार आहे़
पीक विम्यासाठी प्रयत्न सुरू ़़़
धुळे जिल्ह्यात या वर्षी दुष्काळी परिस्थिती होती, त्यामुळे या वर्षी धुळे जिल्ह्यातील शेतकºयांना पीक विमा मिळावा म्हणून मंत्री रावल यांनी अधिकाºयांना सूचना दिल्या आहेत. पीक विमा कंपनीने जिल्ह्यात सर्व्हे केला असून, धुळे जिल्ह्याला लवकरच निधी मंजूर होईल, अशी माहिती मंत्री रावल यांनी दिली आहे.