कृषीदिनी धुळे जिल्ह्यातील 14 शेतक:यांचा गौरव

By admin | Published: July 2, 2017 11:47 AM2017-07-02T11:47:28+5:302017-07-02T11:47:28+5:30

‘कृषी’तील योगदान : जिल्हा परिषद व कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचा:यांचाही उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार

The Gratitude of 14 Farmers from Dhule District | कृषीदिनी धुळे जिल्ह्यातील 14 शेतक:यांचा गौरव

कृषीदिनी धुळे जिल्ह्यातील 14 शेतक:यांचा गौरव

Next

 ऑनलाईन लोकमत 

धुळे , दि.1 - जिल्ह्यातील 14 शेतक:यांचा त्यांनी कृषी क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाबद्दल शनिवारी कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सपत्नीक गौरव करण्यात आला. जिल्हा परिषद आणि कृषी विभाग यांनी संयुक्तपणे तालुक्यातील पिंप्री येथील कृषी चिकित्सालयात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव दहिते अध्यक्षस्थानी होते तर मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी. उद्घाटक म्हणून उपस्थित होते. या गौरव सोहळ्याला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजरुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी, जि.प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती लीलावती बेडसे, समाजकल्याण सभापती मधुकर गर्दे, शिक्षण व आरोग्य सभापती नूतन निकुंभ, महिला व बालकल्याण सभापती वंदना गुजर, धुळे पं.स. सभापती अनिता पाटील, उपसभापती दिनेश भदाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, प्रकल्प संचालक (आत्मा) डॉ.बी.एन. पाटील, कृषी उपसंचालक बी.के. वारघडे आदी उपस्थित होते. 
राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वालन व त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 
या वेळी कृषी क्षेत्र, फलोत्पादन, सेंद्रिय शेती व शेवगा लागवड यात दिलेल्या योगदानाबद्दल इंदिरा शिवाजी साळुंखे, मुकटी, संजय तुकाराम गवळे, नेर, चिंधा आत्माराम पाटील, नगाव, रामकृष्ण गोविंदा पाटील, वडजाई, राजेंद्र अर्जुन भामरे, वार, ता.धुळे, विजय साहेबराव बागुल, शेवगे, मोन्या हान्या मावची, चरणमाळ, राजेंद्र आनंदा अहिरे, खटय़ाळ, किशोर देवराम देवरे, म्हसदी, नितीन जयंतराव ठाकरे, काळगाव, ता.साक्री, देवीदास रामभाऊ पाटील, वर्शी, धनराज हिलाल माळी, रामी, ता.शिंदखेडा आणि सुभाष खजान पावरा, वकवाड व जनार्दन तानाजी पाटील, भाटपुरा, ता.शिरपूर या शेतक:यांचा  मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र, शाल, श्रीफळ व छत्री देऊन गौरव करण्यात आला. 

Web Title: The Gratitude of 14 Farmers from Dhule District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.