गोदामाला भीषण आग, कपाशी जळून खाक; हजारोंचे नुकसान

By देवेंद्र पाठक | Published: May 19, 2023 06:10 PM2023-05-19T18:10:25+5:302023-05-19T18:10:37+5:30

पारोळा रोडवरील फागणे गावानजीक असलेल्या एका गोदामाला अचानक आग लागली.

Great fire to godown, gutting cotton Loss of thousands | गोदामाला भीषण आग, कपाशी जळून खाक; हजारोंचे नुकसान

गोदामाला भीषण आग, कपाशी जळून खाक; हजारोंचे नुकसान

googlenewsNext

धुळे : पारोळा रोडवरील फागणे गावानजीक असलेल्या एका गोदामाला अचानक आग लागली. यात हजारो रुपयांचा कापूस जळून खाक झाला. मध्यरात्रीनंतर ही आग लागली. सुदैवाने जीवितहानी टळली आहे. शहरातील पारोळा रोडवर फागणे शिवारात हॉटेल शांतीसागरच्या मागील बाजूस कपाशीने भरलेल्या गोदामास अचानक आग लागली. 

आग लागल्याचे समजताच प्रत्यक्षदर्शींनी शक्य त्या पद्धतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. तथापि आगीने उग्ररूप धारण केल्याने अखेर महापालिकेच्या अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा केल्यानंतर आग आटोक्यात आणण्यास सुरुवात झाली. वेगवेगळ्या दोन बंबामधून पाण्याचा मारा करण्यात आल्याने काही वेळानंतर आग आटोक्यात आली. यावेळी अग्निशामक दलाचे अधिकारी दुष्यंत महाजन, अमोल सोनवणे, जितेंद्र सरोदे, संतोष शिरसाठ, मंजरअली खतीब, विजय माळी, असलम शाह यांनी भडकलेली आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. यावेळी मालक भैय्या चौधरी उपस्थित होते. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. आग विझविण्यासाठी मात्र मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.
 

Web Title: Great fire to godown, gutting cotton Loss of thousands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.