धुळे येथील घरफोडीतील चार लाखांचा मुद्येमाल हस्तगत

By admin | Published: May 31, 2017 06:06 PM2017-05-31T18:06:03+5:302017-05-31T18:06:03+5:30

पथकाने अटक केलेल्या दोन चोरटयांकडून सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह गुन्ह्यात वापरण्यात येणारी कार व दोन दुचाकी असा एकूण 4 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला

Grievance of four million rupees in the burglary of Dhule | धुळे येथील घरफोडीतील चार लाखांचा मुद्येमाल हस्तगत

धुळे येथील घरफोडीतील चार लाखांचा मुद्येमाल हस्तगत

Next

ऑनलाईन लोकमत

धुळे, दि. 31 - शहरातील देवपूर परिसरात धनदाई कॉलनीत गेल्या दोन महिन्यापूर्वी झालेल्या घरफोडीची   उकल करण्यात  विशेष पथकाला यश आले आह़े पथकाने अटक केलेल्या दोन चोरटयांकडून  सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह गुन्ह्यात वापरण्यात येणारी कार व दोन दुचाकी असा एकूण 4 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, अशी  माहिती पोलीस अधीक्षक एम. रामकुमार यांनी  दिली़
यावेळी अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपअधीक्षक हिंमत जाधव आदी उपस्थित होत़े देवपूरातील धनदाई कॉलनीत घरफोडी करून चोरटय़ांनी सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह लाखोंचा मुद्देमाल लंपास केला होता़ याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात अज्ञात चोरटय़ांविरूध्द गुन्हा दाखल झाला होता़ या गुन्ह्यात उपअधीक्षक हिंमत जाधव यांच्या पथकाने अन्वरखा नासीरखान पठाण (रा़ जामचामळा, चाळीसगाव रोड) व विकास उर्फ विक्की मधुकर चौधरी (रा़ दंडेवाला बाब नगर, मोहाडी) या दोघा संशयितांना अटक केली़ त्यांच्याकडून  5 तोळे वजनाची सोन्याची मंगलपोत, 13 ग्रॅमचे सोन्याचे टोंगल व झुमके, 5 ग्रॅमच्या सोन्याचे चार अंगठय़ा, 208 ग्रॅम वजनाचे चांदीचे तांबन, 2 चांदीचे  फुलपात्र, 2 वाटय़ा, 1 समई तसेच घरफोडी व चोरीसाठी वापरण्यात येणारी कार (क्ऱ एमएच 18 वाय 198), दोन दुचाकी (क्ऱ एमएच 19 ए़ एल 6168 व एमएच 20 बी़ वाय 9822) असा एकुण 4 लाखांचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला आह़े
 ही कामगिरी पथकातील पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, सहाय्यक उपनिरीक्षक घनश्याम मोरे, पो़ना पंकज चव्हाण, मोहंमद मोबीन,  सुनिल पाथरवट, पो़काँ दिनेश परदेशी, निलेश महाजन, पंकज खैरमोडे, किरण साळवे यांनी केली़

Web Title: Grievance of four million rupees in the burglary of Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.