सहावा संशयित आरोपी पुण्यातून जेरबंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 12:53 AM2017-07-28T00:53:17+5:302017-07-28T00:56:05+5:30
गुड्ड्या खून प्रकरणातील सहाव्या संशयित आरोपीला पुणे जिल्ह्यातील दौंड येथून गुरुवारी पहाटे ताब्यात घेण्यात आले़ पकडलेल्या संशयिताचे विक्की चावरे असे नाव आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : गुड्ड्या खून प्रकरणातील सहाव्या संशयित आरोपीला पुणे जिल्ह्यातील दौंड येथून गुरुवारी पहाटे ताब्यात घेण्यात आले़ पकडलेल्या संशयिताचे विक्की चावरे असे नाव आहे़ त्याला विशेष पथकाने धुळ्यात आणले़ याप्रकरणी आता संशयित आरोपी ६ आणि त्यांना मदत करणारे ६ असे एकूण १२ जण अटकेत आहेत़
मंगळवार, १८ जुलै रोजी पहाटे गुड्ड्याचा खून झाला़ यात बंदुकीसह तलवार आणि धारदार शस्त्राचा वापर झाला होता़ ही घटना सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाल्यानंतर संशयितांची नावे जाहीर करण्यात आली़ त्यांची नावे सांगणाºयांना पोलीसांनी बक्षीस जाहीर केले़ याकामी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती़ त्यांना मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव आदी ठिकाणी आरोपींच्या शोधासाठी पाठविण्यात आले होते़
ताब्यात असलेले संशयित
सुुरुवातीला पोलिसांनी सागर साहेबराव पवार उर्फ कट्टी आणि अभय उर्फ दादू देवरे या दोघांना अटक केली़ त्यानंतर भीमा देवरे व योगेश जगताप या दोन आरोपींना दोंडाईचा येथे बुधवारी पहाटे पाठलाग करून अटक करण्यात आली. तर गणेश बिवाल यास मध्य प्रदेशातील खंडवा येथून अटक करण्यात आली. विशेष पथकाने पुण्यातील दौंड येथून एका साखर कारखान्यातील कामगाराच्या निवासस्थानी लपून बसलेला विक्की चावरे यास गुरुवारी पहाटे ताब्यात घेतले़ त्यामुळे संशयित आरोपींची संख्या आता सहावर पोहचलेली आहे़ तसेच त्यांना मदत करणारेदेखील पोलिसांच्या रडारवर आहे़ घटना घडल्यापासून ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये ६ जणांचा समावेश आहे़ त्यामुळे मुख्य संशयित आरोपी आणि त्यांना मदत करणाºयांची संख्या आता १२ झालेली आहे़