गुड्या खून प्रकरणी समितीचा तपास सूरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 04:24 PM2017-08-09T16:24:58+5:302017-08-09T16:25:43+5:30

पोलीस अधीक्षक : माहितीचे संकलन सुरु

guddya murdered case check committee | गुड्या खून प्रकरणी समितीचा तपास सूरु

गुड्या खून प्रकरणी समितीचा तपास सूरु

Next
ठळक मुद्देगुड्या खूनाचा तपास कामी विशेष चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे़ त्यानुसार मालेगावचे सहाय्यक पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार यांना समितीचे प्रमुख नियुक्त करण्यात आलेले आहे़तपासी अधिकारी तथा उपअधीक्षक हिम्मत जाधव, मालेगावचे उपअधीक्षक गजानन सातमाने, पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, पोलीस अधीक्षक यांचे वाचक आनंद निकम, चाळीसगावचे सहाय्यक पोलीस अधीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शाखेचे पंजाबराव राठोड यांचा समावेश करण्यात आला़ समितीचे कामकाज सुरु देखिल झाले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : रफियोद्दीन शफियोद्दीन शेख उर्फ गुड्ड्या याचा खून प्रकरणाचा तपास आता ‘विशेष चौकशी समिती’ यांच्यामार्फत सुरु करण्यात आलेली आहे़ स्थानिक पोलीस देखील त्यांना मदत करत असल्याचे पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी सांगितले़ 
गुड्याचा खून १८ जुलै रोजी सकाळी झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तपासाची गती दिली होती़ टप्या-टप्प्याने मुख्य संशयित आणि त्यांना मदत करणारे अशा सुमारे १६ जणांना जेरबंद करण्यात पोलिसांनी यश आले आहे़ अशातच हे प्रकरण मुंबई क्राईम ब्रँचकडे सुपुर्द करण्यासंदर्भात चर्चेला उधाण आले होते़ पण, तो निर्णय अद्याप बाकी असलातरी याबाबतच मात्र विशेष चौकशी समिती (एसआयटी) स्थापन करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि त्यानुसार पोलीस आयुक्तांना सूचना देण्यात आली़ 

गुड्या खून प्रकरणाच्या तपासासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे़ कामकाजासाठी समितीचे सदस्य बुधवारी धुळ्यात आलेले नव्हते़ असे असलेतरी समितीचे कामकाज मात्र सुरु झाले आहे़ 
- एम़ रामकुमार
पोलीस अधीक्षक, धुळे

Web Title: guddya murdered case check committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.