धर्मगुरूंचे मार्गदर्शन समाजासाठी प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 10:44 PM2019-09-23T22:44:54+5:302019-09-23T22:45:17+5:30

राम भदाणे : सोनगीरातील जैन मंदिरास भेट

The guidance of the religious leaders is inspirational to the community | धर्मगुरूंचे मार्गदर्शन समाजासाठी प्रेरणादायी

dhule

googlenewsNext

धुळे : समाजात विधायक कार्य करण्यासाठी धर्मगुरूंचे मार्गदर्शन व आशीर्वाद मला प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राम भदाणे यांनी सोनगीर येथे केले.
जैन धर्माचे एक पवित्र पर्व मानल्या जाणाऱ्या पर्युषण पर्वानिमित्त त्यांनी सोनगीर येथील दिगंबर जैन मंदिराला व जैन समाजबांधवांना राम भदाणे यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, या पवित्र पर्वात भेट दिल्यामुळे मी अतिशय भारावून गेलो आहे. जैन धर्माच्या कार्याचा महिमा महान आहे. जगाच्या इतिहासात जैन धर्म हा एक शांतप्रिय व अहिंसेचा पुरस्कार करणारा धर्म म्हणून ओळखला जातो. या पर्वात भेट दिल्या नंतर मिळालेल्या ऊर्जेचा व आशीर्वादाचा उपयोग समाजात विधायक कार्य करण्यासाठी निश्चितपणे मला अत्यंत प्रेरणादायी ठरेल, असे भदाणे यांनी सांगितले.
या प्रसंगी चंदन जैन, राहुल जैन, अतुल जैन, प्रितम जैन, विरेंद्र जैन, शेखर जैन, जिनेंद्र जैन आर.पी. जैन, सामाजिक कार्यकर्ते रविराज माळी यांच्यासह जैन समाजबांधव तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: The guidance of the religious leaders is inspirational to the community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे