नववर्षाच्या पूर्वसंध्येस गुटका दारूची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 10:32 PM2019-12-31T22:32:09+5:302019-12-31T22:33:04+5:30

धुळे : दारुबंदी युवा मोर्चातर्फे करण्यात आले प्रबोधन

 Gutka Gourmet Holi on New Year's Eve | नववर्षाच्या पूर्वसंध्येस गुटका दारूची होळी

Dhule

Next

धुळे : संपूर्ण महाराष्ट्र दारुबंदीच्या महिला युवा मोर्चाच्या वतीने व्यसनमुक्त महाराष्ट्र चळवळअंतर्गत नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला गुटका व दारूची होळी करून व्यसनमुक्त जगण्याची शपथ देण्यात आली.
तरुणवर्ग व्यसनाच्या आहारी जात आहे. ३१ डिसेंबरला काहीतरी करावे असे सर्वांना वाटत असते. मात्र, चांगला उपक्रम किंवा निश्चय करीत असताना बहुदा दारूच्या आहारी जात असतात. या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबरनिमित्त जयहिंद महाविद्यालयाच्या चौकात दारुबंदीच्या घोषणा देण्यात आल्या. नवीन वर्ष म्हणजे पुढील जीवन व्यसनमुक्त जगू, अशी शपथ घेण्यात आली. तसेच दारुबंदीविषयी प्रबोधन करण्यात आले.
यावेळी गुटख्याच्या पुड्या, दारू बाटली यांची चौकात होळी करण्यात आली. या उपक्रमास दारुबंदीच्या अध्यक्षा गीतांजली कोळी, सुजाता आढे, संगीता जोशी, लक्ष्मी खंडेलवाल, जयश्री अहिरराव, चेतन उपाध्याय, प्रकाश पाटील, शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title:  Gutka Gourmet Holi on New Year's Eve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे