हळदीच्या कार्यक्रमातच दोन गटात हाणामारी
By admin | Published: May 23, 2017 05:33 PM2017-05-23T17:33:17+5:302017-05-23T17:33:17+5:30
चिंचवार येथील घटना : दगड विटांसह सळईंचा सर्रास वापर, 8 जण जखमी, गावात तणाव
Next
ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.23- हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरुन धुळे तालुक्यातील चिंचवार गावात हाणामारीची घटना घडली़ यात दोन गट आमने-सामने आल़े लाठय़ा-काठय़ा आणि दगड विटांसह लोखंडी सळईंचा वापर झाला़ या हल्ल्यात 8 जण जखमी झाल़े घटनेचे वृत्त कळताच पोलिसांनी धाव घेतली़ या घटनेमुळे चिंचवार गावात तणाव निर्माण झाला आह़े दरम्यान, घटनेतील आरोपींची रात्री उशिरार्पयत धरपकड सुरु होती़ परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यात आली़
पहिल्या गटातर्फे संजय हिरामण बागुल (30) या शेतक:याने सोनगीर पोलिसात फिर्याद दाखल केली आह़े या गटातील संजय हिरामण बागुल, कारभारी हिरामण बागुल, हिरालाल बाबुलाल बागुल, सखाराम बाबुलाल बागुल, धनराज हिरामण बागुल हे जबर जखमी झाले आहेत़ तर दुस:या गटातील किशोर भगवान मासुळे (26) या तरुणाने फिर्याद दिली आहे. या गटातील किशोर भगवान मासुळे, शिवाजी आप्पा मासुळे, सागर देविदास मासुळे हे जबर जखमी झाले आहेत़ या घटनेमुळे चिंचवार या गावात तणावाचे वातावरण आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सी़ एस़ चातुरे करीत आहेत़