देवपुरातून वृद्धेची अर्धी सोनपोत लंपास
By admin | Published: June 4, 2017 12:57 AM2017-06-04T00:57:51+5:302017-06-04T00:57:51+5:30
माळीनगरातील घटना : पत्ता विचारण्याचा बहाणा, गुन्हा दाखल
धुळे : पत्ता विचारण्याचा बहाणा करून वृद्धेची एक तोळे वजनाची अर्धी सोन्याची पोत धूमस्टाईल चोरटय़ांनी ओढून नेली़ ही घटना शनिवारी सकाळी देवपुरातील वलवाडी शिवारातील माळीनगरात घडली़ याप्रकरणी दुचाकीवरील दोन अज्ञात चोरटय़ांविरुद्ध पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आह़े
माळीनगरातील ओम बिल्डिंगजवळील प्लॉट क्रमांक 52 मध्ये राहणा:या वसुधा मुकुंद पाठक (वय 66) या शनिवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास घराशेजारी वॉचमला अन्न पदार्थ देण्यास गेल्या होत्या़ तेथून परत येताना दुचाकीवर आलेले दोन जण त्यांच्याजवळ येऊन थांबल़े त्यांनी हेल्मेट व टोपी घातलेली होती़ दुचाकीवर मागे बसलेला चोरटय़ाने खाली उतरून शर्मा व पाटील कोठे राहतात, असा पत्ता विचारण्याचा बहाणा केला़ तेव्हा पत्ता सांगत असताना त्याने वसुधा पाठक यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची पोत ओढली़ त्यात पोत तुटल्याने एक तोळ्याची 15 हजार रुपये किमतीचे अर्धीपोत चोरटय़ांनी हाती लागली़ त्यानंतर चोरटे धूमस्टाईलने पसार झाल़े याप्रकरणी वसुधा पाठक यांनी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 30 ते 35 वयोगटातील दोन अज्ञात चोरटय़ांविरुद्ध भादंवि कलम 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक एस़ के. पाटील करीत आहेत़