दोन तोळे सोन्यासाठी विवाहितेचा छळ; सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By अतुल जोशी | Published: March 4, 2024 07:44 PM2024-03-04T19:44:27+5:302024-03-04T19:44:37+5:30
धुळे तालुका पोलिस स्टेशनला सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
धुळे : विवाहितेने माहेरून दोन तोळे सोने व तीन लाख रुपये आणावेत या मागणीसाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलिस स्टेशनला सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील विवाहितेचा विवाह मे २०२३ मध्ये झाल्याच्या १५दिवसानंतर दोन तोळे सोने व तीन लाखांसाठी छळ करण्यात आला तसेच तिला जीवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आली. तिच्या फिर्यादीवरून पती, सासूसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक संतोष देवरे करत आहेत.