विवाहितांचा छळ, सासरच्या मंडळीवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 02:05 PM2019-10-25T14:05:41+5:302019-10-25T14:06:06+5:30
वेगवेगळे गुन्हे : पैसे आणि कारसाठी त्रास
धुळे : घर बांधण्यासाठी माहेरून पैसे आणावेत या मागणीसाठी विवाहितांचा शाररिक व मानसिक छळ करण्यात आला. याप्रकरणी धुळे तालुका, धुळे शहर पोलीस स्टेशनला सासरच्या मंडळींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक लाखासाठी छळ
विवाहितेने घर बांधण्यासाठी माहेरून एक लाख रूपये आणावेत यासाठी तिचा शाररिक व मानसिक छळ करण्यात आला. तसेच तिला शिवीगाळ करून मारहार केल्याची घटना १९ मे ते २० जून २०१९ या कालावधीत धरमपूर (गुजरात) व विसरणे (ता. धुळे) येथे घडली. याप्रकरणी विवाहिता ज्योतीबाई उर्फ उर्मिला करण पवार हिने धुळे तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून सासू लिलाबाई पवार, सासरे दादाराव पवार, अनिल पवार, अहिल्या पवार, रवींद्र पवार, मंदा पवार, रामदास जाधव, मीना जाधव (सर्व रा.धरमापूर, गुजरात) यांच्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल जे.एस. सोनार करीत आहेत.
कारसाठी विवाहितेचा छळ
दुसऱ्या एका घटनेत विवाहितेने घर व कार घेण्यासाठी माहेरून ५ लाख रूपये आणावेत यासाठी तिचा शाररिक व मानसिक छळ केल्याची घटना ५ फेब्रुवारी १८ ते आॅक्टोबर २०१९ दरम्यान घडली.
याप्रकरणी किरण जितेंद्र तोंडे (नागतकर) रा. खंडवा, ह.मु. मालेगावरोड धुळे हिने धुळे शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून पती जितेंद्र तोंडे , सासरे नाना तोंडे, सासू वैशाली तोंडे, नणंद प्रियंका तोंडे (सर्व रा.खंडवा), स्रेहा गोटे, संजय गोटे (रा. इंदूर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल के.आय.सैय्यद हे करीत आहेत.