नेर येथे कोरोनामुळे मुख्याध्यापकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:30 PM2020-08-14T12:30:55+5:302020-08-14T12:34:28+5:30
गावात एकाच दिवशी आढळले आणखी तीन रूग्ण
नेर (जि.धुळे) : येथील एका शाळेच्या ५१ वर्षीय मुख्याध्यापकाचा नाशिक येथे उपचार घेताना गुरुवारी मृत्यू झाला.कोरोनामुळे आतापर्यंत गावातील हा तिसरा बळी ठरलेला आहे.
नेर येथील शाळेच्या मुख्याध्यापकांना ८ दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर सुरवातीला धुळे येथे उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती अधिक खालावल्याने, त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले होते. उपचारादरम्यना गुरूवारी त्यांंचा मृत्यू झाला.
तसेच ग्रामपंचायतीने पाच दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आल्याने कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. गावातील एकूण ४० जणांचा अहवाल येण्याची प्रतीक्षा आहे. नेर गावात मंगळवारी ५ जण कोरोनाबाधित आढळून आल्याने त्यांच्या संपकार्तील ३६ जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल येण्याचा बाकी असून पुन्हा ३ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. हे तीन्ही रुग्ण हे वाहनचालकाच्या परिवारातील आहे. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या संपकार्तील चार जणांना १०८ क्रमांकाच्या दोन रुग्णवाहिकेने धुळे येथे नेण्यात आले आहे.