करवंदच्या सरपंच मनिषा पाटील यांना आरोग्य पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 06:05 PM2019-02-22T18:05:01+5:302019-02-22T18:05:15+5:30
प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्यावतीने आशा स्वयंसेविकांमार्फत गावात जनजागृती
शिरपूर तालुक्यातील करवंद गावात ग्रामपंचायतीमार्फत मूलभूत सेवासुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. रस्ते, नियमित पाणी, सांडपाणी निचरा यासह आरोग्य सेवा उपलब्ध करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. त्यासाठी गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्यावतीने आशा स्वयंसेविकांमार्फत गावात जनजागृती केली जाते. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनात दोन-दोन महिन्यात गावात आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे ग्रामस्थांना त्यांच्या आरोग्य विषयक समस्यांची सोडवणूक होते. औषधोपचारांसह त्यांच्या आरोग्यविषयक प्रश्न, शंकांचे समाधान करण्यात येते. लहान तसेच नवजात बालकांसाठी वेळोवेळी लसीकरण शिबिरांचे गावातच आयोजन करण्यात येते. त्यामुळे नव्या पिढीच्या आरोग्याची काळजी बालपणापासूनच घेतली जाते. ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांना ग्रामस्थांचेही संपूर्ण सहकार्य लाभते. रस्ते, सांडपाणी निचरा, पथदिवे आदी पायाभूत सोयींकडे प्राधान्याने लक्ष पुरविले जाते. या पुरस्कार सोहळ्यात सरपंच मनिषा पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला़