‘डाबरी’ घरकुलातील नागरिकांचे आरोग्य दुर्लक्षामुळे येतेय धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 10:39 PM2020-08-22T22:39:12+5:302020-08-22T22:39:37+5:30
शानाभाऊ सोनवणे। सांडपाण्याची लावा विल्हेवाट, आंदोनाचा इशारा
धुळे : सध्या पावसाचे दिवस सुरु आहेत़ साथीचे आजार पसरु शकतात, याची जाणीव आरोग्य विभागाला आहे़ मात्र दोंडाईचा येथील नगरपालिका प्रशासन सुस्त आहे़ डाबरी घरकुलातील सांडपाण्याची पाईपलाईन पुर्णपणे ब्लाक झाली आहे़ परिणामी सांडपाणी तिथेच साचत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे़ याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी केला आहे़
हा प्रश्न लवकरात लवकर सोडवा़ अन्यथा, आंदोलन करण्याचा इशारा सोनवणे यांनी दिला आहे़ या भागातील रहिवाश्यांनी नगरपालिका प्रशासनाला १४ आॅगस्ट रोजी तक्रारी अर्ज दिला आहे़ तरीदेखील अद्यापपावेतो अर्जाची कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही़ नागरिकांच्या आरोग्याची कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याची ओरड होऊ लागली आहे़ दरम्यान, यासंदर्भात शानाभाऊ सोनवणे यांच्याशी संपर्क साधून घरकुल परिसरातील सांडपाण्याची समस्या सांगितली़ रोज सकाळी कचरा गाडीवर आॅडीयोव्दारे कोरोना या संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करण्याचे आवाहन करतात़ त्यात पावसाळ्यात डास मंच्छर यांचा प्रादुर्भाव जास्त होतो आहे म्हणून पाणी साठवु नका असे सांगतात़ परंतु हे फक्त आॅडीओ तयार करून देखावा दाखवण्यापेक्षा आरोग्य सभापती, कर्मचारी व अधिकाऱ्यांनी दोंडाईचा शहरातील गटारी व स्वच्छतेवर लक्ष द्यावे असे सोनवणे यांनी सांगितले़