साक्री येथील कोविड केअर सेंटरला आरोग्य सभापतींची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 09:44 PM2020-05-06T21:44:33+5:302020-05-06T21:44:48+5:30
अधिकारी, कर्मचाऱ्यांची केली विचारपूस : रुग्णांच्या काळजी विषयी समाधान
लोकमत न्यूज नेटवर्क
साक्री : शहराबाहेरील समाजकल्याण आश्रम शाळेत कोविड केअर सेंटरला बुधवारी धुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि शिक्षण सभापती मंगला सुरेश पाटील यांनी भेट दिली. तेथील रुग्णांबाबत व उपलब्ध सुविधांबाबत विचारपूस केली.
तेथे २४ तास सेवा देत असलेल्या आरोग्य विभागाच्या आठ कर्मचाऱ्यांना, जिल्हा आरोग्यअधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांना काही अडचणी आहेत का याविषयी विचारपूस केली. त्याचप्रमाणे तेथील स्वछता तसेच आवश्यक साहित्य आणि आरोग्य यंत्रणेकडून घेतली जाणारी रुग्णांची काळजी याविषयी मंगला पाटील यांनी समाधान व्यक्त केले. सोशल डिस्टन्स ठेवून विचारपूस करण्यात आली. याप्रसंगी भाजपचे प्रांतिक सदस्य सुरेश पाटील, जि.प. सदस्य विजय ठाकरे, कासारे गटाचे जि.प.सदस्य गोकुळ परदेशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवचंद्र सांगळे, सहाययक जिल्हा आरोग्यधिकारी डॉ.मनीष पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आशुतोष साळुंके आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साक्री शहरातील पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. म्हणून जिल्ह्यात खळबळ उडाली होती. नंतर शिंदखेडा, धुळे आणि शिरपूर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला. धुळे शहरातील भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेजला चारही तालुक्यातील कोरोना संशयितांना धुळे येथे तपासणीसाठी जावे लागत होते. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत होते.
मात्र खासदार डॉ.सुभाष भामरे व जि.प.च्या आरोग्य आणि शिक्षण सभापती मंगला पाटील यांच्या आरोग्य विभागाच्या अधिकाºयांच्या आढावा बैठकीनंतर प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानंतर प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर सुरू झाले.
प्रत्येक तालुक्यातच कोरोना संशयितांच्या नमुन्यांची तपासणी सुरू झाली आहे. या निर्णयामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.