आरोग्य यंत्रणेला आता सहकार्याचीच अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 08:52 PM2020-04-11T20:52:13+5:302020-04-11T20:52:34+5:30

चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

The health system now needs cooperation | आरोग्य यंत्रणेला आता सहकार्याचीच अपेक्षा

आरोग्य यंत्रणेला आता सहकार्याचीच अपेक्षा

Next

देवेंद्र पाठक ।

‘कोरोना विषाणू मानवी आरोग्यासाठी घातक ठरणारा आहे. या विषाणूपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकांनी स्वत:ची काळजी घेणे महत्वाचे आहे़ आवश्यक ती आरोग्याची यंत्रणा सज्ज असलीतरी नागरीकांनी देखील सहकार्याची भावना ठेवावी़ घरातच रहावे, असा सल्ला महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ़ महेश मोरे यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना दिला ़
प्रश्न : शहरातील आरोग्याची यंत्रणा आपण कशा पध्दतीने हाताळत आहात?
उत्तर : कोरोनाच्या अनुषंगाने सध्या महापालिका हद्दीतील घरोघरी जावून सर्व्हेक्षण सुरु केले आहे़ कोणत्या आजाराचे किती रुग्ण आहेत त्याच्या माहितीचे संकलन सुरु केले आहे़ त्यासाठी डॉक्टरांचे ३ पथक तयार केले आहे़
प्रश्न : नागरीकांच्या आरोग्यासंदर्भात सहकार्य मिळते का?
उत्तर : महापालिकेचा आरोग्य विभाग सांभाळत असताना विविध प्रभागातील नगरसेवक, महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजीज शेख यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभत आहे़ त्यांच्याकडून वेळोवेळी येणाऱ्या सुचनांचे पालन केले जात आहे़
प्रश्न : सद्याच्या परिस्थितीत कोणत्या बाबींची महापालिकेच्या आरोग्य विभागाला आवश्यकता आहे?
उत्तर : धुळेकर नागरीकांच्या केवळ सहकार्याची अपेक्षा सध्या महापालिकेच्या आरोग्य विभागाला आवश्यकता आहे़ शासनाच्या आदेशाचे पालन करणे, घरातच थांबणे याची गरज आहे़
प्रश्न : आरोग्य विभागात किती पदे रिक्त आहेत?
उत्तर : महापालिकेत सध्या केवळ एक-दोन पदे सोडल्यास कोणतीही अन्य पदे रिक्त नाहीत़ जी रिक्त पदे होती ती यापुर्वीच भरण्यात आलेली आहे़ त्यामुळे आरोग्याच्या दैनंदिन कामकाज काही अडचणी सध्यातरी नाहीत़ महापालिका क्षेत्रात सध्या १६ दवाखाने सुरु असून त्याठिकाणी १६ वैद्यकीय अधिकारी काम करत आहेत़ याशिवाय ३ वैद्यकीय अधिकारी फिरत्या पथकात कार्यरत असून तेथे आपली सेवा बजावित आहेत़
दवाखान्यात पुरेसा औषधांचा साठा!
कोरोनाबाबत जागृती करत असताना महापालिकेचा आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे़ तसेच सर्वसामान्य नागरीकांसाठी त्यांच्या आरोग्यासाठी पुरेसे लक्ष दिले जात आहे़ त्यासाठी जो काही लागणारा औषधांचा साठा आहे, तो पुरेसा आहे़ सध्यातरी त्याची कोणत्याही प्रकारची कमतरता दिसत नाही़ आवश्यकता भासेल त्या प्रमाणात औषधांचा साठा उपलब्ध करुन दिला जाणार आहे़
जनजागृतीवर सर्वाधिक लक्ष
कोरोनाच्या अनुषंगाने नागरीकांचे प्रबोधन केले जात आहे़ त्यासाठी शासनाच्या आदेशानुसार त्यांनी घरातच थांबण्याचे आवाहन त्यांना वेळोवेळी केले जात आहे़ धुळ्यात विदेशातून आलेले ५५ जण, पुणे व मुंबई आणि अन्य शहरातून धुळ्यात दाखल झालेले ५९० जण, आणि किरकोळ आजाराचे ९५० जण प्राथमिक तपासणीतून समोर आलेले आहेत़ त्यांना आवश्यक त्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत़
धुळ्यात यापुर्वी डेंग्यूसह स्वाईनफ्ल्यूने थैमान माजविले होते़ आता कोरोना आहे़ त्यावरही नियंत्रण मिळविला जाईल - डॉ़ महेश मोरे

Web Title: The health system now needs cooperation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे