मे हीटचा तडाखा अन् उकाडाही झाला असह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 10:52 PM2020-05-04T22:52:56+5:302020-05-04T22:53:13+5:30

तापमानाचा पारा ४२ वर : एक मे रोजी आठवड्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद

The heat of May was unbearable | मे हीटचा तडाखा अन् उकाडाही झाला असह्य

मे हीटचा तडाखा अन् उकाडाही झाला असह्य

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : उन्हाळ्याच्या शेवटच्या महिन्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे़ त्यामुळे मे हीटचा तडाखा अन उकाडाही आता असह्य झाला आहे़ लॉकडाउनमुळे उपाययोजना करण्यास मर्यादा येत असल्याने नागरीक पुरते हैराण झाले आहेत़
धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे़ सोमवारी ४२ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद झाली़ किमान तापमान २१ अंश तर आद्रता ५०.२५ नोंदविण्यात आली़ रविवारी कमाल तापमान ४२.६, किमान २६ तर आर्द्रता ५७.२७ नोंदविण्यात आली़ शनिवारी कमाल तापमान ४३.३ आणि किमान २३.४ आणि आद्रता ५४.२३ नोंदविण्यात आली़ मे महिन्याच्या सुरूवातीलाच तापमानाने उच्चाक गाठला़ या आठवड्यातील सर्वाधिक तापमान एक तारखेला नोंदविण्यात आले़ या दिवशी कमाल तापमान ४३.४ तर किमान तापमान २५.४ अंश सेल्सीयस होते़ या दिवसाची आद्रता देखील ५४. २३ होती़ दुपारच्या वेळेला कमाल तापमानाचा पारा वाढता असल्याने उन्हाचे चटके जाणवत आहेत़ तर सायंकाळनंतर किमान तापमानाचा पारा देखील वाढतच असल्याने आद्रतेचे प्रमाण वाढले आहे़ त्यामुळे रात्रीच्या वेळेला उकाडा वाढला आहे़ दिवसा उन्हाचे चटके तर रात्री घामाच्या धारा अशा दुहेरी तडाख्याने धुळेकरांसह जिल्ह्यातील नागरीक हैराण झाले आहेत़
लॉकडाउनमुळे यंदाच्या उन्हाच्या झळा अधिकच जाणवत आहेत़ आईसक्रीम, शीतपेये यांचा दरवर्षी असणारा आधार यंदा लॉकडाउनमुळे हिरावला गेला आहे़ सर्वसामान्यांचे निंबू पाणी पिवून सर्वांनाचा दूधाची तहान ताकावर भागवावी लागत आहे़
उन्हाच्या तीव्रतेपासुन वाचण्यासाठी दरवर्षी हील स्टेशनवर जावून आराम आणि एन्जॉय करणाऱ्यांचे नियोजन देखील यंदा लॉकडाउनमुळे कोलमडले आहे़ कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती असल्याने दक्षता म्हणून नागरीक घरातच राहणे पसंत करीत आहेत़ त्यामुळे उन्हाची आणि उकाड्याची दाहकता अधिकच जाणवत आहे़
ज्यांच्या घरात एसी आणि कुलर आहेत त्यांच्यासाठी नेहमीप्रमाणे उन्हाळा नाहीच्या बरोबरच आहे़ परंतु कामगार, कष्टकऱ्यांना मात्र दरवर्षापेक्षा यावर्षी अधिक त्रास सहन करावा लागत आहे़ लॉकडाउनमुळे कामे बंद असल्याने बाहेर पडता येत नाही़ त्यातच पत्र्याच्या घरात मे हीटच्या तटाख्यापुढे सर्वसाधारण पंखा कुचकामी ठरत आहे़ कुलर घेण्याची ऐपत असलेले लॉकडाउनमुळे दुकाने बंद असल्याने कुलर देखील घेवू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे़ ज्यांच्याकडे कुलर आहे त्यांना ते कुलर दुरुस्त करण्याची सुविधा उपलब्ध नाही़ उन्हाची तीव्रता वाढत असल्याने लॉकडाउनच्या तिसºया टप्प्यात पंखे आणि कुलरच्या दुकानांना केंद्र शासनाने मुभा दिली असली तरी धुळे शहरातील बांधितांची संख्या लक्षात घेता संपूर्ण लॉकडाउन जाहीर केल्यामुळे दुकाने बंदच आहेत़
पंखे, कुलरची दुकाने बंद असल्याने गैरसोय
मे हीटच्या तडाख्यामुळे दिवसभर कडक उन आणि त्यामुळे रात्री होणाºया प्रचंड उकाड्याला हैरान झालेल्या नागरीकांनी आता पंखे आणि कुलर खरेदीची लगबग सुरू केली आहे़ परंतु दुकाने बंद असल्याने अनेकांची गैरसोय होत आहे़ ज्यांच्याकडे जुने कुलर आहेत त्यांनी दुरूस्तीला प्राधान्य दिले आहे तर ज्यांना नव्याने खरेदी करावयाचे आहे त्यांनी आपल्या नेहमीच्या दुकानदाराशी संपर्क करुन घरपोच पंखे आणि कुलर मागवून घेण्यास सुरूवात केली आहे़ डेझर कुलरच्या बंद दुकानांमध्ये गर्दी न होवू देता दुरूस्तीचे काम सुरू आहे़

Web Title: The heat of May was unbearable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे