दमदार पावसाने घरे, पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 09:55 PM2019-09-08T21:55:50+5:302019-09-08T21:56:09+5:30
छत कोसळून जवखेड्यात एकाचा मृत्यू : वर्षीत घरांची पडझड, खुडाणेत पिकांसह माती वाहून गेली
धुळे : जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होत असून त्यामुळे घरांची पडझड, पुराचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने पिकांचे तसेच शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. शिरपूर तालुक्यातील जवखेडे येथे रविवारी पहाटे घराचे छत कोसळल्याने त्याखाली दबून एकाचा जागीच मृत्यू झाला. शिंदखेडा तालुक्यातील वर्षी येथे अनेक घरांची पडझड झाली आहे.
छत कोसळल्याने एकाचा मृत्यू
तºहाडी - शिरपूर तालुक्यातील जवखेडा येथे घराचे छत कोसळल्याने त्याखाली दबून एकाचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे ही दुर्दैवी घटना घडली. गुलाब लोटन पाटील (५५) असे मृताचे नाव आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून रोज सायंकाळी मुसळधार पाऊस पडत असल्याने शनिवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे घरात एकटे झोपले असताना पहाटे चार वाजता घराचे छत अचानक कोसळले. त्या छताखाली दबून पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. ते घरी एकटे असल्याने ग्रामस्थांना उशिरा समजले. त्यामुळे तत्काळ मदत मिळू शकली नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. पीडित कुटुंबाला तत्परतेने मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. मयत गुलाब पाटील यांची पत्नी आजारी असून तिच्यावर नाशिक येथे दवाखान्यात उपचार सुरू आहेत. पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परीवार आहे.
विंचूर परिसरात सर्व बंधारे ओसंडले
विंचूर - धूळे तालुक्यात विंचूर निमगुळ सह बोरी नदी परिसरात नियमित पाऊस सुरू असून रविवारी दुपारी पुन्हा दोन तास जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मांडळ धरणासह दोंदवाड, विंचूर, धामणगाव, बोधगाव आदी गावांचे सर्व कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे ओसंडून वाहू लागले आहेत. पुरमेपाडा धरण ‘ओव्हर फ्लो’ झाल्याचे कळताच पंचक्रोशीतील नागरिकांनी ते पाहण्यासाठी गर्दी केली होती.
‘रोहिणी’च्या पुराने नुकसान
निजामपूर - साक्री तालुक्यात खुडाणे शिवारात रोहिणी नदीला आलेल्या पुराचे पाणी कोल्हापूर सिमेंट बंधाºयाच्या बाजूने शेतात घुसून उभे बाजरी पीक व शेत जमीन वाहून गेली आहे. खुडाणे शिवारात रोहिणी नदी काठास प्रकाश बाबूराव काळे यांची शेती आहे. गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने रोहिणी नदीस मोठा पूर आला होता. नदीत असलेल्या कोल्हापूर टाईप बंधाºयाच्या बाजूने पुराचे पाणी काळे यांच्या शेतात घुसले. त्यामुळे २० गुंठे बाजरीच्या उभ्या पिकासह ३० गुंठे शेत जमीन वाहून गेली. पोलीस पाटील अनिल जाधव, शेतकरी कन्हैयालाल काळे, छबूलाल काळे, ग्रा़ पं़ सदस्य महारु माळचे, शेतकरी मालक प्रकाश बाबूराव काळे उपस्थित होते.
वर्षी येथे अनेक घरांची पडझड
वर्षी - शिंदखेडा तालुक्यातही दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत असून वर्षी ८० ते ९० घरांची पडझड झालेली आहे़ शेतात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर शिरल्याने कपाशीसह मका, बाजरी, ज्वारी, मूग पिकांचे नुकसान झाले आहे़ असाच जर पाऊस दोन तीन दिवस राहिला तर पिके शेतकºयांच्या हातून जातील अशी भिती निर्माण झाली आहे़ सतत पडणाºया पावसामुळे विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे़