भंगार साहित्याबाबत लपवाछपवी!
By Admin | Published: January 18, 2017 12:08 AM2017-01-18T00:08:13+5:302017-01-18T00:08:13+5:30
मनपा : नगरसेवक पाटोळेंनी मागविली माहिती
धुळे : शहराला पाणीपुरवठा करणा:या जलवाहिन्या, व्हॉल्व्हला वारंवार लागणा:या गळत्यांची मनपा प्रशासनाकडून दुरुस्ती केली जात असली तरी भंगार साहित्याचे काय होते, याची नोंद कुठेही ठेवली जात नसल्याचा आरोप नगरसेवक संदीप पाटोळे यांनी केला होता़ त्यानंतरही मनपाची याबाबत लपवाछपवी सुरू असल्याचे दिसून येत आह़े
शहराला पाणीपुरवठा करणा:या जलवाहिन्या जीर्ण झालेल्या असल्याने त्यांना वारंवार गळत्या लागत असतात़ गेल्या वर्षभरात जलवाहिन्यांना तब्बल 758 गळत्यांच्या तक्रारी आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली होती़ दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी पारोळा रोडवर तीन ठिकाणी गळती दुरुस्तीचे काम करण्यात आले व त्यावर झालेल्या खर्चाचा विषय मंजुरीस्तव 31 डिसेंबरला आयोजित स्थायी समितीच्या सभेत ठेवण्यात आला होता़ त्या वेळी नगरसेवक संदीप पाटोळे यांनी सभेत, नगरपालिका असतानापासून आतार्पयत मनपाने किती गळत्यांची दुरुस्ती केली, भंगार साहित्य कुठे गेले? किती व कोणत्या नवीन साहित्याची खरेदी केली? त्याबाबत जमा-खर्चाचा ताळमेळ अंदाजपत्रकात का दर्शविण्यात आला नाही? असे प्रश्न उपस्थित करून प्रशासनाला जाब विचारला होता़ तसेच स्थायीच्या सभांमध्ये गळती दुरुस्तीवर झालेल्या खर्चाला मंजुरी घेतली जात असली तरी गळतीचे ठिकाण, वापरण्यात आलेले साहित्य, झालेल्या खर्चाचा तपशील ही सर्व माहिती सविस्तर टिपणीद्वारे सदस्यांना देण्यात यावी, अशी मागणीदेखील पाटोळे यांनी केली होती़ त्या वेळी उपायुक्त रवींद्र जाधव यांनी आठवडाभरात माहिती मागविण्याचे आश्वासन दिले होत़े मात्र 17 दिवस उलटूनही कोणतीही माहिती मनपा प्रशासनाकडून अद्याप संकलित करण्यात आली नसल्याचे नगरसेवक पाटोळे म्हणाल़े अखेर पाटोळे यांनी माहिती अधिकारात सदरची माहिती मागविली असून मनपा प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आह़े