उच्चशिक्षित समाज आई-वडील सांभाळण्यात अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 11:16 PM2019-12-07T23:16:42+5:302019-12-07T23:22:41+5:30
निराधारांसाठी आधार ‘मातोश्री वृध्दाश्रम’
चंद्रकांत सोनार ।
आयुष्यभर अहोरात्र काबाड कष्ट करून मुलांसाठी रक्ताचे पाणी करतो़ केवळ मुलांनी आई-वडीलांचा सांभाळ करावा म्हणून, आज गरीब मुलाकडून सांभाळ होतो़ मात्र उच्चशिक्षित समाज आजही आई-वडील सांभाळण्यास अपयशी ठरत असल्याचे मत मातोश्री वृध्दाश्रमाचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी व्यक्त केले़
प्रश्न : मातोश्री वृध्दाश्रमाची स्थापना केव्हा व नेमके उद्देश काय आहे ?
उत्तर : नकाणे तलाव परिसरात मातोश्री वृध्दाश्रमाची स्थापना ५ सप्टेंबर १९९८ रोजी झाली़ सुरूवातीला अनुदान मिळत होते़ त्यानंतर अनुदानात बंद झाल्यानंतर दानशुर व्यक्तीच्या मदतीने वृध्दाश्रमातील निराधार व्यक्तींना अन्नदानाची व्यवस्था होत आहे़
प्रश्न : मुल, सुना नांतवड असा परिवार असतांना ही निराधार होण्याची का वेळ येते
उत्तर : या वृध्दाश्रमात ३७ निराधार जोडपी आहेत़ आई-वडील मुलासाठी कोट्यावधीची मालमत्ता जमवितात़ शेवटी पैशावरून वाद होतात़ मुलगा, सुना नोकरी करतात़ त्यामुळे वृध्दांधा सांभाळणारे कोणी नसल्याने कौटूंबिक वाद होतात़ म्हणून निराधार होण्याची वेळ येते़
प्रश्न : आजपर्यत किती निराधारावर अंत्यसंस्कार वृध्दाश्रमाकडून झाला
उत्तर : या वृध्दाश्रमात मुख्याध्यापक, शिक्षिका, रेल्वे पोलिस, क्रिकेटपटू, कलावंत, अशा उच्चपदाच्या अधिकाऱ्यांनी निवृत्तीनंतरचा काळ वृध्दाश्रमात काढला आहे़ येथील सर्वच वृध्द निराधार नाहीत़ तर ज्यांना मुल, सुना, मुलगी, जावाई, नातवंडे, नातू असा परिवार असतांनाही वृध्दाश्रमात राहण्याची वेळ आली आहे़ आई-वडीलांचे अंतिम दर्शन घेण्यास देखील मुलं नकार देतात़ त्यामुळे आजपर्यत २५ वृध्दावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे़
आई-बापापेक्षा पैसा सर्वात श्रेष्ठ
आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर जे घर आई-वडीलासांठी सुरक्षित वाटायचे़ तेच घर कालातंराने असुरक्षित वाटायला लागते़ आपली काळजी घेणारे मुलांसाठी आई-वडील केवळ पैसा कमावण्याचे माध्यम होते़ याची जेव्हा जाणीव होते़ तेव्हा मुलांचा खरा स्वभाव लक्षात येतो़
उच्चशिक्षित समाज अपयशी
रक्ताचे पाणी करून मुलांना डॉक्टर, वकील, अभियंता, प्राध्यापक तसेच शासकीय अधिकारी पदापर्यत नेत्यात ज्या आई-वडीलाचे महत्वाचा वाटा असतो़ त्याच उच्चशिक्षित समाजाकडून आई-वडीलांचा सांभाळ करता येत नाही़ सर्वकाही असतांना वृध्दाश्रमात आयुष्य काढावे लागते़