शहरातील अनधिकृत मंडपांसह होर्डिंग्ज, बॅनर्सकडे ‘कानाडोळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 04:18 PM2019-04-08T16:18:49+5:302019-04-08T16:19:54+5:30

महापालिकाही हतबल

Hoardings with unauthorized buildings in the city, 'Kanadola' by Banners | शहरातील अनधिकृत मंडपांसह होर्डिंग्ज, बॅनर्सकडे ‘कानाडोळा’

dhule

Next

धुळे : शहरात झळकणाऱ्या बेकायदेशिर होर्डिंग्जवर अनेकदा महापालिकेने कारवाई केली आहे़ परंतु तरी देखील होर्डिंग्ज व बॅनर्सच्या माध्यमातून जाहिरात करण्याचे प्रमाण कमी होत नसल्याने महापालिकाही हतबल झाल्याचे दिसत आहे़
मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेवर निर्णय देतांना १४ मार्च २०१३ ला राज्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रातील अवैध होर्डिंग्ज व बॅनर्स तत्काळ हटविण्याचा आदेश दिल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून शहरात काही प्रमाणात कारवाई देखील करण्यात आली़ मात्र काही दिवसांच्या कारवाईनंतर अवैध होर्डिंग्ज व बॅनर्स पुन्हा झळकू लागले़ त्यानंतर किरकोळ कारवाई वगळता कोणत्याही प्रकारची मोठ्या स्वरूपाची कारवाई महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेली दिसून येत नाही़

Web Title: Hoardings with unauthorized buildings in the city, 'Kanadola' by Banners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे