धुळे महापालिकेसमोर शिवसेनेतर्फे मालमत्ता कराच्या बिलांची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 11:39 AM2018-03-01T11:39:53+5:302018-03-01T11:39:53+5:30
वाढीव कर आकारणीला विरोध, मालमत्तांच्या पुर्नमुल्यांकनाची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिकेतर्फे वाढीव दराने करआकारणी केली जात असल्याचा आरोप करीत शिवसेनेतर्फे मनपासमोरच मालमत्ता कराच्या बिलांची होळी करण्यात आली़ करआकारणीचा दर कमी करून मालमत्तांचे पुर्नमुल्यांकन करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेतर्फे यावेळी करण्यात आली़
ध्शहरात असलेल्या मनपा मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडून भाडेकर, वाढीव रेडीरेकनर, नव्याने कर आकारणी होत असलेला सेवा कर त्यामुळे गाळेधारकांना मोठा भुर्दंड बसणार आहे़ तसेच शहरातील नागरिकांच्या दरडोई उत्पन्नाचा विचार न करता प्रशासनाकडून मालमत्ता कराची आकारणी होत आहे़ त्यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी वर्ग भरडला जात आहे़ गाळेधारकांना तसेच मालमत्ताधारकांना कर आकारणी कोणत्या हिशेबाने होते, याची सुस्पष्टता होणे आवश्यक आहे़ त्यामुळे प्रशासनातर्फे मालमत्तांचे पुर्नमुल्यांकन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली़ तसेच मालमत्ता कराच्या बिलांची होळी करण्यात आली़ यावेळी विरोधी पक्षनेत्या वैशाली लहामगे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, प्रा़ शरद पाटील, सतिश महाले, विश्वनाथ खरात, राजेश पवार, भुपेंद्र लहामगे, राजेंद्र पाटील, सुनिल बैसाणे, भटू गवळी, किरण जोंधळे, पंकज भारस्कर, हेमा हेमाडे, रविंद्र काकड, जोत्स्ना पाटील, प्रफुल्ल पाटील, ललित माळी उपस्थित होते़