एका मिसकॉल मिळतील ग्राहकांना घरपोच पैसे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 10:51 PM2018-10-31T22:51:53+5:302018-10-31T22:54:18+5:30

 धुळे जिल्ह्यात अडीच हजार खातेदार ; डिसेबरअखेर ४७३ शाखेतून सुविधा

The home offers money to the customers of a MISCOL | एका मिसकॉल मिळतील ग्राहकांना घरपोच पैसे 

एका मिसकॉल मिळतील ग्राहकांना घरपोच पैसे 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे-  शहरासह खेड्यापर्यंत टपाल खात्याचे जाळे विस्तारले आहेत़ शहरासह गावातील नागरिकांना पोस्ट बॅँकेत सामावून घेण्यासाठी सराकारने  सप्टेंबर महिन्यात आपका बॅँक, आपके द्वार योजनेची घोषणा केली होती़ या योजनेतून ग्राहकांना घरबसल्या  मिसकॉल केल्यावर घरपोच पैसे मिळणार आहे़ दरम्यान दोन महिन्यात जिल्हातील २ हजार ७४६ ग्राहकांनी या योजनेतून खाते सुरू केली आहेत़  
राज्यातील १ लाख २९ हजार ३५६ कार्यालये डिजीटल करण्यात आली आहे़ छोट्या रकमेपासून बचतीची सवय लावणाºया या खात्याची वाटचाल आता बँकिंगच्या दिशेने होत आहे. राष्ट्रीयीकृत, सहकारी बँकांना टक्कर देण्यासाठी टपाल विभागाने २००५ पासून तयारीला सुरूवात केली होती़ पेमेंट बँकिगला परवानगी मिळल्यानतर औरगाबाद विभागातील नांदेड पोस्ट कार्यालयातील सर्वाधिक ग्राहक या योजनेतून आहे़.
जिल्हात पोस्ट पेमेंट बँकेचे २ हजार ७४६  खातेदार: पारंपारीकता सोडून आता जिल्हा टपाल कार्यालय आता डिजीटल झाले आहे़ ग्राहकांना घरबसल्या मनीआॅर्डर, डिपॉझिटची सुविधा पोस्ट कार्यालयाने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे़ त्यानुसार  टपाल कार्यालयांची रचनासुद्धा बँकेप्रमाणे करण्यात आली आहे़ या योजनेतून ग्राहकांना बँकांप्रमाणे एटीएम, चेकबुकची सुविधा दिल्या जाणार आहेत़  आतापर्यत महाराष्ट्रातील १२ हजार ८५९ टपाल कार्यालयातून ही सुविधा आहे़  धुळे टपाल कार्यालयाचे शहरासह ग्रामीण भागात  ४७३ टपाल कार्यालय आहेत़ त्यातील दहा टपाल कार्यालयात प्राथमिक तत्वावर पेमेन्टस बॅकेची सुविधा आहेत़ त्यातील २ हजार ७४६ ग्राहकांनी खाते सुरू केली आहेत़. 
 डिसेबरअखेर ४७३ कार्यालयात पोस्ट पेमेंट बँक : शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना घरपोच सुविधा मिळाव्या यासाठी सरकारने डाकविभाग डिजीटल करून बँकेच्या सुविधा केल्या आहेत़ त्यामुळे टपालाच्या सर्वच बचत योजनांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे़ दिसतो. इंडिया पोस्ट पेमेंट बँके'तून प्राथमिक तत्वावर जिल्ह्यातील दहा टपाल शाखेतून सुविधा उपलब्ध आहेत़ दरम्यान योजनेपासून लाभार्थी वंचित राहू नये यासाठी डिसेंबरअखरे ४७३ टपाल शाखेतून इंडिया पोस्ट पेमेंट बँके सुरू केली जाणार आहे़ 
शासकिय सबसिडीसाठी पेमेंट बँक महत्वाची : केंद्र व राज्यसरकारच्या विविध योजनांसाठी नागरिकांनी सबसिडीचा लाभ देण्यात येतो़ मात्र गावात बॅकेची शाखा, एटीएमची सुविधा नसल्याने नागरिकांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी शहरात जावे लागते़ मात्र पेमेंट बॅकेतूूूून लाभार्थीला मिसकॉल दिल्यास पोस्टमन कडून पैस मिळणार आहे़ त्यामुळे वेळ व पैशांची बचत होणार आहे़. 
ग्राहकांना या मिळतात सुविधा : सध्या टपाल विभागातून बँकिंगप्रमाणे अनेक सुविधा देण्यात येत आहेत. यामध्ये सेव्हिंग बँक, एटीएम, रिकरिंग डिपॉझिट, मंथली इन्कम स्कीम, सिनिअर सिटीझन, सुकन्या समृद्धी, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, पीएफ, किसान विकासपत्र, बचत विमा, इलेक्ट्रॉनिक मनिआॅर्डर, विदेशी चलन सेवा आदी बँकांप्रमाणे विविध सुविधा देण्यात येत आहेत.
ग्राहकांना थमवर खाते: सरकारी किंवा खाजगी बॅकेत बॅकेत खाते उघडल्यासाठी आधारकार्ड, मतदान कार्ड, फोटो किंवा इतर आवश्यक कागदपत्रासह रक्कम शिल्लक ठेवावी लागते़ मात्र इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडण्यासाठी ग्राहकाचे आधारकार्ड लिंक असेल तर अंगठ्याच्या थमव्दारे काही मिनीटात खाते उघडून दिले जाते़  त्यामुळे ग्राहकाची वेळेची बचत व पैशांची गजर भासत नाही़.

Web Title: The home offers money to the customers of a MISCOL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे