लॉकडाऊनमध्ये निराधारांना मिळाला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 10:05 PM2020-07-27T22:05:38+5:302020-07-27T22:07:01+5:30
चंद्रकांत सोनार । लोकमत न्यूज नेटवर्क कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अडीच महिन्यासाठी जिल्हा लॉकडाऊन केला होतो़ अशा अडचणीच्या काळात उद्योग, ...
चंद्रकांत सोनार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अडीच महिन्यासाठी जिल्हा लॉकडाऊन केला होतो़ अशा अडचणीच्या काळात उद्योग, व्यवसाय बंद असल्याने लाभार्थ्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागू नये, योजनेच्या कार्यालयामार्फेत लाभार्थ्यांच्या बॅक खात्यात अनुदानाची रक्कम दरमहिन्याला वर्ग करण्यात येत आली़ २०१९ मध्ये शासनाने घेतलेला आॅनलाईन प्रणालीचा निर्णय लॉकडाऊन काळात महत्वकांशी ठरला असे मत संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार सुचीता चव्हाण यांनी लोकमत शी बोलतांना सांगितले़
प्रश्न: शहरातील लाभार्थ्यांना किती योजनांचा लाभ दिला जातो?
उत्तर: संजय गांधी योजना कार्यालया मार्फत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना, इंदिरा गांधी अपंग योजना योजना अशा पाच योजनांचा लाभ दिला जातो़
प्रश्न: बॅकेकडे आतापर्यत किती खाते वर्ग करण्यात आले आहेत ?
उत्तर: शासन योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम पोस्टाच्या खात्यात वर्ग केली जात होती़ मात्र पारदर्शकपणे लाभ मिळावा़ यासाठी आॅनलाइन प्रणाली सुरू करण्यात आली आहे़ त्यानुसार शहरातील अडीच हजार लाभार्थ्यांचे खाते बॅकेकडे वर्ग करण्यात आलेले आहेत़
प्रश्न: शहरात किती लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जातो?
उत्तर: दिव्यांग, विधवा, घटस्पोटीत, ज्येष्ठ नागरिक अशा लाभार्थ्यांना ६०० ते १ हजार रूपयापर्यंत लाभ दिला जातो़ योजना सुरू झाल्यापासून शहरात या योजनेचे ११ हजार महिला व पुरूष लाभार्थी आहेत़ या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना दर महिन्याला बॅकेद्वारे अनुदानाची रक्कम वर्ग केली जाते़
प्रश्न: लाभार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी काय प्रयत्न केले
उत्तर: सर्वसामान्य व्यक्तीपर्यत पोहचविण्यासाठी शासनाने २०१९ पासून पाचही योजना आॅनलाइन केल्या आहेत़ त्यामुळे लाभार्थ्यांना लाभ मिळावा, यासाठी कुणाची मदत घ्यावी लागत नाही़ आॅनलाईन फॉर्म भरल्यानंतर मिळालेले टोकनव्दारे कार्यालयात तपास करून निश्चित योजनेचा लाभ मिळू शकतो़
महा-ई सेवा केंद्रात सुविधा उपलब्ध
शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना गैरसोय होऊ नये तसेच सहरित्या लाभ मिळावा़ याहेतून आपले सरकार ई सेवा केंद्रामार्फेत लाभार्थ्यांना योजनेसाठी अर्ज करता येतो़ त्यानंतर चौकशी होऊन लाभ दिला जातो़
कार्यालयात एक खिडकी योजना
आॅनलाईन अर्ज भरल्यानंतर लाभार्थ्यांना टोकन क्रमाकं दिला जातो़ त्याद्वारे लाभार्थी कार्यालयात येवून आपल्या अर्जाची खात्री करून शकतो़ लॉकडाऊन काळात काही प्रकरणे प्रलंबित आहेत़ त्यासाठी लाभार्थी कार्यालयात येवून पाठपुरावा करीत आहे़ लाभार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शहर तहसील कार्यालयात एक खिडकी चौकशीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे़
बॅक खाते गरजेचे
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी मध्यस्थांशी व्यवहार करण्याची गरज नाही़ आवश्यक कागदपत्रे आणि राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणे गरजेचे आहे़