सफाई कर्मचा-यांना मिळणार घरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:30 AM2018-12-24T11:30:57+5:302018-12-24T11:31:46+5:30
महापालिका : २ हजार ७२० चौमी जागेची संपादन प्रक्रिया पूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिकेच्या सफाई कर्मचाºयांना हक्काची घरे दिली जाणार असून त्यासाठी २ हजार ७२० चौमी जागा संपादीत करण्यात आली आहे़ त्यानिमित्त भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय पवार यांनी भाजप पक्षश्रेष्ठी व महापालिका अधिकाºयांचे आभार मानले आहेत़
सफाई कामगारांना डॉ़ बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी कामगार आघाडीतर्फे २७ फेब्रुवारीला महापालिका आयुक्त, महापौर, स्थायी समिती सभापतींकडे करण्यात आली होती, त्याची दखल घेऊन कार्यवाही करण्यात आली़ या प्रस्तावासाठी संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे, भाजप कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय केनेकर, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी प्रयत्न केले़ त्यामुळे भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय नरेश पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाºयांचे आभार मानले़ यावेळी उपाध्यक्ष सुरज अहिरराव, जिल्हा सरचिटणीस किशोर जाधव, महानगर उपाध्यक्ष अनिल दिक्षित, गणेश वाडेकर, शुभम गुरव, दिपक डंगोरे, राज अहिरे, कामगार प्रतिनिधी हिरालाल डंगोरे, काशिनाथ लोहरे, चंदन घारू, सुभाष पवार, गुरू घारू उपस्थित होते़
स्थायी समिती सभापती वालिबेन मंडोरे यांच्या प्रयत्नांमुळे १२ जून २०१८ च्या सभेत रामदेव बाबा नगरमधील वाल्मिकी मेहतर समाजाच्या सफाई कामगारांना आवास योजनेचा लाभ देण्यासाठी सर्व्हे क्रमांक ५३२/१/अ मधील जागा आरक्षित करण्यात आली होती़ त्यानुसार २७२०़१० चौमी जागा जिल्हाधिकाºयांकडे संपादीत करण्यात आली आहे़ त्यामुळे सफाई कामगारांना स्वत:ची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़