घरकूल-झोपडप˜ट्टीवासियांचा प्रश्न पेटण्याची चिन्हे

By admin | Published: February 18, 2015 11:54 PM2015-02-18T23:54:12+5:302015-02-19T13:11:22+5:30

न. पा.समोर उपोषण : आंदोलन तीव्र होणार

Homework-slum Trivia question blinking signs | घरकूल-झोपडप˜ट्टीवासियांचा प्रश्न पेटण्याची चिन्हे

घरकूल-झोपडप˜ट्टीवासियांचा प्रश्न पेटण्याची चिन्हे

Next

न. पा.समोर उपोषण : आंदोलन तीव्र होणार
धरणगाव : येथे १९७० पासून असलेल्या झोपडप˜ी वासियांची घरे त्यांच्या नावावर करून त्यांना सिटी सर्व्हे नंबर मिळावा, मंजूर असलेल्या घरकुलाच्या लाभार्थींना पूर्ण अनुदान तत्काळ मिळावे या मागणीसाठी न.पा. राष्ट्रवादीचे गटनेते दीपक वाघमारे यांच्या नेतृत्वाने न.पा.समोर उपोषण सुरू करण्यात आले आहे. येत्या २४ तासात प्रशासनाने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
शहरात गौतमनगर, रामदेवजी बाबानगर, संजय नगर, हनुमान नगर, नेहरु नगर, हमाल वाडा आदी झोपडप˜्या अदमासे ४०-४५ वर्षांपूर्वी शासनाच्या जागेवर वसल्या आहेत. पालिकेने या झोपडप˜ी वासियांसाठी रस्ते, वीज, पाणी गटार आदी नागरी सुविधा पुरविल्या आहेत. तसेच सर्व रहिवासी न.पा.ची घरप˜ी, पाणीप˜ी आदी कर भरत आहे. मात्र न.पा.ने अद्याप त्यांच्या नावाचाक सि.स. उतारा मिळणेची कार्यवाही केलेली नाही. २००१ च्या आदेशानुसार सर्व झोपडप˜ी वासियांना सि.स. उतारा मिळण्याची मागणी आहे.
तसेच जिल्हास्तरीय समितीने रमाई घरकूल योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या घरकुलांच्या लाभार्थींना अनुदान देण्यास न.पा. प्रशासन हेतूपुरस्कर टाळाटाळ करीत आहे. त्यांना अनुदान मिळावे या मागणीसाठी न.पा. गटनेते दीपक वाघमारे यांच्या नेतृत्वाने गो.भि.सोनवणे, शोभा सोनवणे, जॉनी मोरे, गोवर्धन शिरसाठ, दिलीप वाघमारे, शेनफडू सोनवणे, भीमराव सोनवणे, आकाश बिवाल यांच्यासह नगरसेवक, उपनगराध्यक्ष गोविंद कंखरे यांनी उपोषणात सहभाग नोंदविला.
चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे. उद्या १९ रोजी सकाळी ९ वाजता आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चा निघून तहसील कार्यालयावर जाणार आहे. वाघमारे व उपोषणकर्त्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: Homework-slum Trivia question blinking signs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.