धुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी घंटानाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 11:10 AM2019-07-03T11:10:52+5:302019-07-03T11:11:48+5:30
आॅनलाइन लोकमत धुळे : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनतर्फे दुपारी जिल्हा परिषदेतील ...
आॅनलाइन लोकमत
धुळे : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनतर्फे दुपारी जिल्हा परिषदेतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ घंटानाद करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. युनियनतर्फे विविध मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी. यांना दिले.
चौथ्या,पाचव्या व सहाव्या वेतन आयोगापासून जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाºया विविध संवर्गाच्या वेतनश्रेणीतील त्रृटी ७वा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी दूर कराव्यात. अंशदान पेंशन योजना रद्द करून तत्काळ पूर्ववत पेंशन योजना लागू करावी, ग्रामविकास विभागाने सुधारित आकृतीबंधात पदे कमी करू नये, महाराष्टÑ विकास सेवा मधून वर्ग-२ची पदे तत्काळ भरण्यात यावीत, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत वाहन चालकांची पदे पूर्ववत ठेवावीत, जि.प.तील करार, कंत्राटी पद्धतीने वर्षानुवर्षे कार्यरत कर्मचाऱ्यांना कायम करावे आदी कर्मचाºयांच्या मागण्या आहेत. महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाºया कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यासोबतच निवेदने देवून चर्चा करण्यात आली. धरणे आंदोलन करण्यात आलो. तरीही प्रशासनाने जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्या सोडविल्या नाही. त्यामुळे अखेर राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाºयांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २ जुलै रोजी जिल्हा परिषदेतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर घंटानाद आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.
घंटानादानंतर मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी. यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष बलराज मगर, जि.प. कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष दिनेश महाले, लेखा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डी.एम.पाटील, वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष राहूल पवार, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल बैसाणे, क्रास्ट्राईब संघटनचे किशोर पगारे, एकनाथ चव्हाण, महिला अध्यक्षा रंजना साळुंखे यांच्यासह सुमारे २०० कर्मचारी या घंटानाद आंदोलनात सहभागी झाले होते.