तरुणाच्या खुनानंतर आरोपीचे घर जाळले!
By Admin | Published: July 6, 2017 12:30 AM2017-07-06T00:30:14+5:302017-07-06T00:30:14+5:30
पाचही आरोपींना पोलीस कोठडी : महिलांचा मोर्चा, लोकसंग्रामचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तंबाखूच्या पुडीवरून झालेल्या वादात मारहाणीनंतर या प्रकरणातील एका संशयित आरोपीचे घर रात्रीतून जाळण्यात आले़ या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे़
साक्री रोडवरील राजीव गांधीनगरात तंबाखूच्या पुडीवरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट हाणामारीत झाले़ या हाणामारीत संदीप ठाकूर या युवकाचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता़. त्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. रात्रीपासून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी राजीव गांधीनगरातील रमणाबाई विजय ठाकूर (४५) यांनी ५ जुलै रोजी पहाटे पावणेतीन वाजता धुळे शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ घटनेचा पुढील तपास धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल वडनेरे करीत आहेत़
लोकसंग्रामचे एसपींना निवेदन
या घटनेच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन अधिकाºयांच्या विरुद्ध साक्षी पुरावे सादर करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी लोकसंग्रामच्या वतीने पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांच्याकडे बुधवारी निवेदनाद्वारे करण्यात आली़ निवेदन सादर करताना तेजस गोटे यांनी सांगितले की, लोकसंग्रामने शहरात सुरूअसलेली अवैध गुटखा विक्री बंद करण्यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभागाला निवेदन दिले होते. परंतु त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. तसे झाले असते तर कदाचित ही घटना घडली नसती. या वेळी अॅड़ नितीन चोरडिया, अमोल सूर्यवंशी, मनोज वाल्हे, डॉ़ अनिल पाटील, बाळू शेंडगे, शिवाजीराव पाटील, प्रवीण राणा, जावेद किराणा, दीपक जाधव, सचिन पोतेकर, सचिन सूर्यवंशी, शकील खजूरवाले, छोटू गवळी, नाना पाठक, खलिल अन्सारी, अभिमन्यू बच्छाव, राजेंद्र वारुडे, किशोर चौबळ, भगवान जिरेकर आदी उपस्थित होते़
पाचही जणांना कोठडी
राजीव गांधीनगरातील संदीप ठाकूर खूनप्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर पाच संशयितांना धुळे शहर पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले़
त्यात चंद्र्रकांत भालचंद्र चव्हाण (३३), भालचंद्र गंगाराम चव्हाण (६२), संदीप भालचंद्र चव्हाण (३७), मीराबाई भालचंद्र चव्हाण (५५), सरिता चंद्रकांत चव्हाण (२६) (सर्व रा़ राजीव गांधीनगर, साक्री रोड) यांचा समावेश आहे़
या सर्वांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली़
पोलीस बंदोबस्त कायम
दरम्यान, या परिसरात दुसºया दिवशी तणावपूर्ण शांतता होती. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.