सांगली जिल्ह्यात घरफोडी,पाच जणांना शिरपुरात अटक; ट्रक, चांदीच्या दागिन्यांसह ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त

By अतुल जोशी | Published: January 19, 2024 04:48 PM2024-01-19T16:48:45+5:302024-01-19T16:48:56+5:30

धुळे :सांगली जिल्ह्यात घरफोडी, चोरी करून शिरपुरात आलेल्या चोरट्यांच्या टोळीला शिरपूर शहर पोलिसांच्या पथकाने जेरबंद केल्याची कारवाई गुरूवारी रात्री ...

House burglary in Sangli district, five arrested in Shirpur; 33 lakh worth of goods including truck, silver jewelery seized | सांगली जिल्ह्यात घरफोडी,पाच जणांना शिरपुरात अटक; ट्रक, चांदीच्या दागिन्यांसह ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली जिल्ह्यात घरफोडी,पाच जणांना शिरपुरात अटक; ट्रक, चांदीच्या दागिन्यांसह ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त

धुळे :सांगली जिल्ह्यात घरफोडी, चोरी करून शिरपुरात आलेल्या चोरट्यांच्या टोळीला शिरपूर शहर पोलिसांच्या पथकाने जेरबंद केल्याची कारवाई गुरूवारी रात्री करण्यात आली.

टोळीतील पाच गुन्हेगारांकडून पावणे दोन लाखांच्या चांदीच्या दागिन्यांसह गावठी कट्टा, लोखंडी कटर, टॅमी व ३० लाखांचा ट्रक असा एकूण ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पोलिसांनी मोहित धिरजसिंग परिहार(वय २५, रा. बारोल, ता. डबरा, जिल्हा ग्वाल्हेर),राज भरत परिहार (वय २२,रा.करबंदी कॅालनी शिवपुरी,ता. शिवपूरी), जितू सुरतान कुशवाह (वय २१,रा. खेडगाव,जि.ग्वाल्हेर),अमित प्रकाश परिहार (वय २४, रा. सिहोली, ता. मुरार,जि.ग्वाल्हेर), राजीव प्रेमसिंग परीहार (वय २४, रा. शिब्बु का टापरा,शिवपूर, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या संशयित आरेापींची नावे आहेत.

संशयित आरोपींनी तासगाव (ता. सांगली) येथील अशोका ॲन्ड सन्स या सराफा दुकानात चोरी करून फरार झाले होते. याप्रकरणी तासगाव पोलिस स्टेशनला चोरीचा जबरी गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरी करून चोरटे मध्यप्रदेशात ट्रकने जात असताना, शिरपूर पोलिसांनी त्यांना जेरबंद केले. त्यांच्याजवळून ट्रक, चांदीच्या दागिन्यांसह ३२ लाख ९६ हजार २८० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Web Title: House burglary in Sangli district, five arrested in Shirpur; 33 lakh worth of goods including truck, silver jewelery seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :theftचोरी