परसामळच्या ग्रामपंचायत सदस्याच्या घराला आग, साहित्य खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:16 PM2018-05-13T12:16:42+5:302018-05-13T12:16:42+5:30
दीड लाखांचे नुकसान : रविवारी पहाटेची घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : तालुक्यातील परसामळ येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सारुबाई श्रावण भील यांच्या घराला रविवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास आग लागली़ या आगीत रोख रकमेसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले़ शिंदखेडा येथून आलेल्या अग्नीशमन बंबाने आग आटोक्यात आणली़ या घटनेची नोंद पोलिसात करण्यात आली आहे़
घराला लागलेल्या या आगीत गोंधळाच्या कार्यासाठी जमविलेले ५० हजार रुपये जळाले आहेत़ या शिवाय टीव्ही, घरगुती संसारोपयोगी साहित्य, धान्य, १५ नव्या आहेराच्या साड्या याशिवाय अन्य साधनसामुग्री जळून खाक झाले आहेत़ घटना लक्षात येतातच शिंदखेडा तालुक्यातील परसामळ व कुमरेज ग्रामस्थांनी पाण्याचे नळ सुरु करण्यात आले होते़ सर्वांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले असलेतरी शिंदखेडा येथून अग्नीशमन बंब तातडीने दाखल झाला होता़ लागलीच आग आटोक्यात आणण्यात आली़