विद्यार्थ्यांनी स्मरणशक्ती कशी वाढवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 06:02 PM2018-12-08T18:02:48+5:302018-12-08T18:04:02+5:30
शिरपूर : दोन दिवशीय कार्यशाळेत स्रेहल परवाल यांनी मुलांना दिल्या टिप्स
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : वेळेचे नियोजन, ताण तणावापासून मुक्ती, योगासनांचे जीवनात असलेले महत्व, अभ्यास संबंध नियोजन, भविष्य कालीन मार्गदर्शन, ध्यान, एकाग्रता व स्मरणशक्ती कशी वाढवावी ह्या विषयांवर संवाद साधून योगाचे प्रात्यक्षिके करून या संदर्भात मुल्यांना टिप्स दिल्यात़
येथील आर.सी. पटेल इंग्रजी माध्यमिक विद्यालयातील इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन पटेल आॅडीटोरीयम हॉलमध्ये करण्यात आले. कार्यक्रमाचा सुरुवातीला मुंबई येथील विशेष शैक्षणिक सल्लागार स्नेहल परवाल यांनी विद्यार्थ्यांनी काय केले पाहिजे या संदर्भात टिप्स दिल्यात़ यावेळी आर.सी.पटेल इंग्लिश मिडियम स्कूल कमिटी चेअरमन योगेश भंडारी, संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा, प्राचार्य रवि बेलाडकर आदी उपस्थित होते़ याप्रसंगी योगेश भंडारी व डॉ.उमेश शर्मा ह्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दोन दिवसीय कार्यशाळेत स्नेहल परवाल ह्यांनी विविध विषयांवर सखोल चर्चा केली. ह्या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना नवीन अद्यावत ज्ञानाची शिदोरी प्राप्त झाली व अतिशय उत्साहात कार्यशाळा संपन्न झाली़ सुत्रसंचालन जितेंन्द्र पाटील तर आभार प्रदर्शन सैफा अन्सांरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी खरे यांनी सहकार्य केले़