जिल्हास्तरीय खो-खो करीता एच़ आऱ पटेल संघाची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 03:28 PM2018-11-27T15:28:18+5:302018-11-27T15:28:50+5:30
कळमसरे येथे तालुकास्तरीय शासकीय शालेय स्पर्धा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : शासकीय शालेय खो-खो स्पर्धेत येथील एच.आर.पटेल कन्या विद्यालयातील खेळाडूंनी वर्चस्व राखत यश पटकाविले़ त्यांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेकरीता करण्यात आली आहे़
तालुकास्तरीय शासकीय शालेय खो-खो स्पर्धा कळमसरे येथे घेण्यात आल्या. त्यात १४ वर्ष व १९ वर्ष मुलींच्या वयोगटात एच.आर.पटेल माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय शिरपूरच्या संघाने विजय संपादन केला. विजयी संघ धुळे येथे होणाºया जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. १४ वर्ष विजयी संघात कर्णधार हंसिका पाटील, भट चेतना, वैष्णवी चौधरी, नेहा ईशी, वैष्णवी महाजन, अनुष्का देसले, भूमिका पाटील, द्रोणीका ठाकोर, निकिता शिंदे, आम्रपाली पाटील, समीक्षा पवार यांनी उत्तम कामगिरी बजावली. तसेच १९ वर्ष संघातर्फे कर्णधार अश्विनी थोरात, हर्षदा ठाकरे, चैताली पाटील, भाग्यश्री पाटील, हषार्ली वाघ, चेतना माळी, अश्विनी ईशी, अश्विनी शिरसाठ, हिताक्षी ईशी, कोमल मोरे, निकिता कोळी यांनी चांगली कामगिरी बजावली.
यशस्वी संघाचे संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सीईओ डॉ.उमेश शर्मा, क्रीडा प्रमुख प्रितेश पटेल, प्राचार्य आर.बी.पाटील यांनी कौतुक केले. विजयी संघाला क्रीडा शिक्षक पी.बी.धायबर, करण शिंदे, सागर माळी, राकेश बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले.