दोंडाईचा येथील कॉलनीवासियांची माणुसकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 10:17 PM2020-05-08T22:17:19+5:302020-05-08T22:17:50+5:30

पायी जाणाऱ्या मजुरांना जेवणासह दिले प्रवासाचे भाडे

The humanity of the colonists at Dondaicha | दोंडाईचा येथील कॉलनीवासियांची माणुसकी

दोंडाईचा येथील कॉलनीवासियांची माणुसकी

Next

दोंडाईचा : कोरोना लॉकडाउनचा फटका सर्वाधिक मोलमजुरी, हातावर पोट भरणाºया मजुरांना बसला आहे. गावी जाण्यास भाडे नाही, म्हणून सुरतेहून शिरपूर तालुक्यातील शिंगावे जाण्यासाठी दोन कुटुंबानी पायीच वारी केली. या पायी जाणाºया कुटुंबाना दोंडाईचा येथील कॉलनी वासीयांनी जेवण, टरबूज खाऊ घालून प्रवासाचे भाडेपण दिले़ यातून त्यांच्या माणुसकीचे प्रतिबिंबही उमटले़
शिरपूर तालुक्यातील शिंगावे येथील दोन कुटुंब मजुरी करण्यासाठी सुरतला गेले होते. कोरोना संचारबंदीत त्यांना काम मिळेनासे झाले. त्यातच ठेकेदारांनी त्यांना आर्थिक मदत नाकारली. त्यांची उपासमार सुरू झाल्याने त्यांनी पाच लहान मुला -बाळासह सुरत येथून पायी -पायी आपले गाव गाठण्याचे ठरविले. सलग चार दिवस, डोक्यावर ओझे घेऊन शुक्रवारी पायी-पायी दोन्ही कुटुंबे दोंडाईचापर्यंत पोहचले. या पायी जाणाºया मजूर कुटुंबाला दोंडाईचा येथील डी़ जी़ नगर व गणेश नगरमधील रहिवाश्यांनी बघितले़ त्यांची विचारपूस केली. सर्वांना भूक तहान लागली होती. कॉलनीतील लोकांनी माणुसकीच्या नात्याने दोन्ही वाटसरू कुटुंबाना थांबविले़ घरुन पाणी आणि भोजनाची व्यवस्था केली. मुलांना टरबूज, डांगर कापून खाऊ घातले. पुढील प्रवासाठी त्यांच्यासोबत भाजी - पोळी, भाकरी, मिरचीचा ठेचा असा डब्बा बांधून दिला. त्यांच्या गावी जाण्यासाठी प्रवासाचे भाडे देऊन वाहनाची व्यवस्था करुन दिली.

Web Title: The humanity of the colonists at Dondaicha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे