धुळ्याचा तापमानाचा पारा ३९ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 11:57 AM2018-03-27T11:57:33+5:302018-03-27T11:57:33+5:30
नागरिकांमध्ये धास्ती, दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहराच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोमवारी ३९.६ कमाल तापमान नोंदवले गेले. अवघ्या दोन दिवसात तापमानात ३ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात काय परिस्थिती असेल, या कल्पनेने नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. वाढत्या तापमानाचा परिणाम दुपारच्या वर्दळीवर झाला असून सोमवारी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. रूमाल, गॉगल, शितपेये, छत्री यांच्या वापरात वाढ होत आहे.
तापमान वाढत असताना आर्द्रता मात्र घटत असल्याने उन्हाची दाहकता वाढत चालली आहे. वाढत्या उन्हाचा परिणाम बाजारपेठेवरही दिसून आला. दुपारी ग्राहक नसल्याने विक्रेत्यांनी छत्र्या, तंबूच्या सावलीचा सहारा घेतला.
वाढत्या तापमानाचा परिणाम नागरिकांच्या दिनचर्येवरही होत आहे. महत्त्वाची कामे सकाळी करण्याकडे कल वाढला आहे. दुपारी चार वाजेनंतर रस्त्यांवर वर्दळ वाढत असून रात्री उशीरापर्यंत रस्त्यांवर गर्दी दिसते.
दिनांक कमाल किमान
२३ मार्च ३६.२ २०.०
२४ मार्च ३७.६ १८.०
२५ मार्च ३८.६ १८.०
२६ मार्च ३९.६ १८.६