माळमाथ्यावरील यात्रोत्सवाची शंभर वर्षाची परंपरा झाली खंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 10:48 PM2020-08-20T22:48:27+5:302020-08-20T22:48:54+5:30
जोगेबा यात्रेवर कोरोनाचे सावट : आगरपाडा ग्रामस्थांकडून नाराजी
बळसाणे : साक्री तालुक्यातील बळसाणे शिवारातील माळमाथ्यावरील यात्रोत्सवाला शंभर वर्षाची परंपरा आहे़ पण, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या परंपरेला खंड पडला असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे़
साक्री तालुक्यातील व माळमाथा भागातील बळसाणे गावापासून सात ते आठ किमीच्या अंतरावरील जोगेबा हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते़ जोगेबा हे देवस्थान टेकडीवर असून याठिकाणी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी यात्रा भरते़ परंतु शंभर वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदा प्रथमच कोरोनामुळे खंडीत झाली आहे़ पोळ्याच्या निमित्ताने भरणाºया यात्रेत माळमाथा परिसरासह खान्देशभरातील शेतकरी बैलजोड्यांना सजवून जोगेबा या देवस्थानावर दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थितीत राहायचे़ मात्र हा पोळा उत्सव कोरोनामुळे साधेपणानेच घरी साजरा करण्यात आला़
दरवर्षी पोळ्यानिमित्त गावातून सजवलेल्या सर्जाराजाची मिरवणूक ढोलताशांच्या गजराने निघायची़ जोगेबा या देवस्थानावर मोठी यात्रा भरायची़ परंतु कोरोना महामारीमुळे शंभर वर्षाची परंपरा यावर्षी खंडीत झाली़ आगरपाडा गावाच्या कुशीत बसलेल्या जोगेबा देवाचे मंदिर असून या गावात पुरातन काळापासून पोळ्याच्या दुसºया दिवशी माळमाथा भागासह जळगाव, नंदुरबार, धुळे या भागातील शेतकरी पाळीव प्राण्यांच्या नवस फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित राहत असत़ त्याचबरोबर साक्री तालुक्यातील दुसाने, बळसाणे, कढरे, सतमाने, ऐचाळे, हाट्टी, इंदवे, घाणेगाव, निजामपूर, साक्री, जैताणे, फोफरे, नागपूर, वरदाने, सतारे, देवी, परसुळे आदी भागातील शेतकरी बैल जोडी, गायी, म्हैस, बकऱ्यांना रंगीबेरंगी कलरांनी व रेबीनांनी सजवून गुलालाची उधळण करीत मिरवणुकीत सहभाग होत असत़ एका दिवसाचा हा यात्रोत्सव असायचा़ याठिकाणी नवस फेडणारे भाविक बाहेरील भक्तांना प्रसाद वाटप करतात़ जोगेबा देवास्थानाची यात्रोत्सव पुरातन काळापासून सुरु आहे़