शंभर मृत्यूदेहावर केले अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 10:38 PM2020-07-28T22:38:11+5:302020-07-28T22:39:05+5:30
कोरोना बाधित : मनपाचे चंद्रकांत जाधव यांच्या पथकाची कामगिरी
धुळे : कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्यावर अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण होत होता. मात्र, स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मनपाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव व त्यांच्या पथकाने शंभर जणांवर अंत्यसंस्कार केले.
कोरोना बाधिताचा मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र परिवार मृतदेह स्वीकारण्यास नकार देत होते. त्यामुळे मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन मनपा आयुक्त अजिज शेख यांनी सहायक आयुक्त चंद्रकांत जाधव व त्यांच्या पथकावर मृतांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी सोपविली. त्यानंतर जात, पंथ, धर्मभेद न करता धार्मिक पद्धतीने विधीपूर्वक कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या शंभर जणांवर जाधव व त्यांच्या पथकाने अंत्यसंस्कार करून माणुसकी धर्म जपला.
अनेकांची दिले योगदान
बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर अत्यंविधीच्या कामात रूग्णवाहीका वाहनचालक अबू अन्सारी, स्वच्छता निरीक्षक विकास साळवे, महेंद्र ठाकरे, भरत येवलेकर आदींनी मोठ्या प्रमाणात स्वयंस्फुर्तीेने या कार्यात मदत केली़