दुष्काळाच्या सामन्यासाठी शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 10:38 PM2018-12-14T22:38:06+5:302018-12-14T22:38:32+5:30

करून दुष्काळाशी सामना करण्यासाठी बळ

Hundreds of hectares of land under drought | दुष्काळाच्या सामन्यासाठी शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कापडणे : धुळे तालुक्यातील बिलाडी कुंडाणे शिवारातील आपल्या शेत जमिनीच्या बाजूला असलेल्या जुन्या नाल्यास कुठल्याही  शासकीय योजनेचा लाभ न घेता स्वखर्चाने कोरून परिसरातील १००-१२५ हेक्टर जमिनीला जलयुक्त करून दुष्काळाशी सामना करण्यासाठी बळ देण्याचे काम जलदूत डॉ.भूषण सुभाषराव गवळे यांनी केले आहे.
मातीविना शेती होऊ शकते पण पाण्या वाचून कधीच नाही, पाण्याचा थेंबन्थेंब महत्त्वाचा आहे. सर्व गोष्टीसाठी पाणीच महत्त्वाचे असून त्या पाण्याचा आपल्याबरोबर इतरांना फायदा कसा होईल याचा विचार करून कृतीत आणले आहे ते डॉक्टर गवळे यांनी.
 सदर नाल्याला खोदल्यामुळे व बांधबंदिस्ती करून दुरुस्ती केल्यामुळे पावसाळ्यात हा नाला मोठ्या शेततळे सारखा पाण्याने तुडुंब भरलेला असतो. त्यामुळे आजूबाजूच्या विहिरींची, कूपनलिकांची  जलपातळीत झपाट्याने वाढ झालेली आहे.  त्याचा फायदा दुष्काळाने होरपळणाºया शेतकºयांच्या मनाला आणि शेतातल्या पिकांना नवसंजीवनी देण्याचे काम डॉ.गवळे यांनी केले आहे.  त्यांनी गेल्या तीन वर्षापासून हळूहळू नाला खोलीकरण बांधबंदिस्ती केला. त्याचे छोटे तळे तयार केले आहे. त्या मध्ये साठलेले पाणी कोणालाही उपसू न देता गावातील गुरे, गायी, बकºया, मेंढ्या यांना पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले आहे. त्याचा उपयोग आजूबाजूचे शेतकरी, मेंढपाळ बांधव, गुरे, बकºयांना होत असून तेही समाधानी होत आहे. डॉ.भूषण गवळे यांनी बिलाडी कुंडाणे शिवारात स्वखर्चाने नाला खोलीकरण बांधबंदिस्ती करून शेततळे तयार केल्याने अशाप्रकारे तुडुंब पाणी त्यात भरले. त्यांनी नाला बांध बंदीस्त केलेले समाजपयोगी काम वाखणण्याजोगे असल्याचे परिसरातून बोलले जात आहे. या पाण्यामुळे अनेकांना फायदा होत आहे.

Web Title: Hundreds of hectares of land under drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे