पिकअप व्हॅनची दुचाकीला धडक पतीचा मृत्यू, पत्नीवर उपचार सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 09:37 PM2019-12-31T21:37:13+5:302019-12-31T21:37:34+5:30

चिमठाणे : दलवाडे शिवारातील घटना

Husband dies in pickup van, husband begins treatment | पिकअप व्हॅनची दुचाकीला धडक पतीचा मृत्यू, पत्नीवर उपचार सुरु

पिकअप व्हॅनची दुचाकीला धडक पतीचा मृत्यू, पत्नीवर उपचार सुरु

Next

शिंदखेडा ^- तालुक्यातील चिमठाणे गावालगत असलेल्या वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनसमोर दुचाकीवर जाणा-या एका दांपत्यास मागाहून येणाऱ्या बोलेरो पिकअप व्हॅनने जोरदार धडक दिली़ या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पतीचा मृत्यू झाला़ तर गंभीर जखमी असलेल्या त्यांच्या पत्नीवर धुळे येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. दरम्यान, जखमी असलेल्या वंदना चौधरी या खान्देशात किर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहेत.
तालुक्यातील चिमठाणे येथील अर्जुन मोहन चौधरी हे आपली पत्नी वंदना यांच्यासह चिमठाणे दोंडाईचा रोडवर दलवाडे शिवारात असलेल्या शेतामध्ये एमएच १८ बीबी ३७९६ या दुचाकीने जात होते. त्याचवेळेस सोनगीरहुन चिमठाणेकडे येणाºया एमएच १८ एए ३८८५ क्रमांकाच्या बोलेरो पिकअप व्हॅनने जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे़ सदर घटना घडल्याची माहिती चिमठाणा फाट्यावरील समाधान हॉटेलचे मालक विजय तुकाराम चौधरी यांना समजली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता या अपघातात अर्जुन चौधरी यांच्या पोटाला, डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली होती. तसेच त्यांची पत्नी वंदना चौधरी यांच्या डोक्याला देखील गंभीर दुखापत झाली. दोघा जखमींना ग्रामस्थांनी चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले़ अर्जुन चौधरी यांना तपासले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले. तर वंदना चौधरी यांना गंभीर दुखापत असल्याने पुढील उपचारासाठी धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वैद्यकीय उपचार सुरु आहेत़ अपघातप्रकरणी शिंदखेडा पोलीस स्टेशनला मयत अर्जुन चौधरी यांचा पुतण्या विजय चौधरी यांनी फिर्याद दाखल केली आहे. मयत अर्जून चौधरी यांच्या पश्चात २ मुलं व १ मुलगी आहे. मुलीचे मागील वर्षी लग्न झाले आहे.

Web Title: Husband dies in pickup van, husband begins treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे