संविधानात राष्टÑाच्या निर्माणाचा विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:08 PM2018-12-24T12:08:48+5:302018-12-24T12:09:25+5:30
प्रा.जोगेंद्र कवाडे : व्याख्यानमालेत प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : देशाच्या संविधानात राष्टÑ निर्माणाचा, देश घडविण्याचा विषय असून त्याचा समग्र विचार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केला, असे प्रतिपादन विद्यापीठ नामांतर लॉँग मार्चचे प्रणेते प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी येथे केले.
शहरातील कोतवाल सभागृहात रविवारी संध्याकाळी येथील डॉ.आंबेडकर अकॅडेमी आयोजित डॉ.आंबेडकर व्याख्यानमालेस प्रारंभ झाला.भारतीय संविधान: अंमलबजावणी, भ्रम व वस्तुस्थिती या विषयावर त्यांनी या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले. यावेळी रिपाइंचे ज्येष्ठ नेते एम.जी. धिवरे, निमंत्रक बाबा हातेकर, प्रा.डॉ.संजीव पगारे, प्रा.डॉ.संजय ढोडरे, प्रा.राजेंद्र पगारे आदी यावळी उपस्थित होते.
शाहु-फुले-आंबेडकर यांच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक क्रांतीचा विचार संविधानात असून त्याचे ज्ञान सर्वसामान्यांना करून देण्याचे काम याद्वारे व्हावे, अशी अपेक्षा प्रा.कवाडे यांनी व्यक्त केली. यावेळी बहुसंख्येने उपस्थिती होती.