आदर्श कनिष्ठ महाविद्यालयास दोन पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:53 AM2018-12-24T11:53:46+5:302018-12-24T11:54:21+5:30
साक्री तालुका विज्ञान प्रदर्शन : माध्यमिक गटात दुसरा तर शिक्षक गटात उत्तेजनार्थ
लोकमत न्यूज नेटवर्क
जैताणे : तालुका विज्ञान प्रदर्शनात आदर्श विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाला दोन पारितोषिक मिळाले आहे.
छडवेल कोर्डे येथे नुकतेचे झालेल्या तालुका विज्ञान प्रदर्शनात आदर्श विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयातर्फे एकूण आठ उपकरणे मांडण्यात आली. त्यातून इयत्ता न्९ वी ते १२ वी गटातून कारखान्यातून बाहेर पडणाºया सांडपाण्याचा पूर्नवापर या उपकरणाला दुसरा क्रमांक मिळाला. हे उपकरण तुषार चैत्राम जाधव व दिपाली महेंद्र खैरनार या नववीच्या विद्यार्थ्यांनी तयार केले होते. त्यांना शाळेतील विज्ञान शिक्षक डी.एस.पावरा यांचे मार्गदर्शन लाभले.
तर कनिष्ठ महाविद्यालयातील रसायन शास्त्राचे शिक्षक डी.ए.तोरवणे यांनी गोवर - रुबेला या विषयावर शिक्षक उपकरण बनविले होते. त्याला शिक्षक गटात उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
तालुका विज्ञान प्रदर्शनात पारितोषिक मिळविणाºया दोन्ही विद्यार्थी व शिक्षक यांचे संस्था चालक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व परिसरातील पालक आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.