धुळ्यातील ती मुर्ती ठरतेय पर्यटकांना विशेष आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 10:01 PM2020-07-27T22:01:17+5:302020-07-27T22:04:15+5:30
श्रावणमास : दोन महिन्यात पूलाचे काम पूर्णत्वास येणार
खान्देशात पहिल्यांदा पांझरा नदीवरील झुलत्या पुलाचे काम माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांच्या संकल्पनेतून होत आहे़ या कामासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या २०१७ मधील बैठकीत ७ कोटी २२ लाख रूपयांच्या निधी मंजूर झाला होता. या निधीतून पांझरा नदीकाठावर दोन्ही बाजुला ५ किमीचे रस्ते तयार करण्यात आले आहे़ या रस्त्यामुळे भविष्यात वाहतूक कमी होऊ नागरिकांना शहराबाहेर जाण्यासाठी मार्ग मोकळा होणार आहे़ शिवाय धुळेकरांना विरंगुळा होण्यासाठी पांझरा नदीच्या मधोमध झुलत्या पुलाचे काम सध्या प्रगतीवर आहे़
झुलत्या पुलाची उंची पांझरा नदी पात्रापासून ९० फूट आहे़ दोन्ही नदी काठावराचे अंतर १६५ फुटापर्यत आहे़ या पुलावर ४०० पर्यटकांची बैठक व्यवस्था करण्याचे नियोजन केले जात आहे़ या पुलाचे पूर्ण वजन एकाच बिमवर ठेवण्यात आले आहे़ तसेच पर्यटकांना ये-जा करण्यासाठी नदी काठावरील दोन्ही बाजुला पायऱ्याची व्यवस्था केली जाणार आहे़ भविष्यात पर्यटकांची गर्दी होऊन याठिकाणी वाहतूकीची कोंडी निर्माण होऊ नय, यासाठी झुलत्या पुलावर जाणाºया रस्ता दोन्ही काठावरील रस्त्याच्यावरून राहणार आहे़ खालचा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा राहणार आहे़ दोन महिन्यात पुलाचे काम पूर्णत्वास येईल अशी माहिती देण्यात आली़
नियोजन सुरू...
धुळेकरांना आकर्षण ठरणारा झुलत्या पुलाचे काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे़ हा प्राजेक्ट पूर्ण झाल्यानंतर नदीकाठावरील पाणी झुलत्या पुलाखाली अडविले जाणार आहे़ तसेच भगवान शंकराच्या मुर्तीबाजूला विविध रंगाचे कारंजे, स्ट्रिटलाईट लावण्यात येणार आहे़ त्यामुळे भविष्यात हा झुलता पूल खान्देशासह एकमेव ठरणारा आहे़