मी बंड केले तर सर्वांना थंड करेल- आमदार अनिल गोटे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 02:36 PM2018-10-02T14:36:45+5:302018-10-02T14:38:34+5:30

भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात इशारा

If I rebelled, I will make everyone cool- MLA Anil Gote | मी बंड केले तर सर्वांना थंड करेल- आमदार अनिल गोटे 

मी बंड केले तर सर्वांना थंड करेल- आमदार अनिल गोटे 

Next
ठळक मुद्दे-आचारसंहिता जाहीर होताच महापौर पदाचा उमेदवार जाहीर करणाऱ- आमच्या रक्तारक्तात भाजप असून आमचा झेंडा भाजपाचाच राहील- एकाही पक्षाची दादागिरी चालू देणार नाही

धुळे- मला बंड करायला भाग पाडू नका, मी बंड केले तर सर्वांना थंड करून टाकेल असा स्पष्ट इशारा आमदार अनिल गोटे यांनी भाजपच्या महानगर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिला़ तसेच महापालिका निवडणूकीसाठी ज्या दिवशी आचारसंहिता लागेल, त्याच्या दुसºया दिवशी शिवतिर्थावर भव्य सभा होईल व त्यात महापौर पदाचा उमेदवार जाहीर केला जाईल, असे आमदार गोटे यांनी स्पष्ट केले़
आमदार अनिल गोटे यांनी भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा पांझरा चौपाटीवरील स्व़ उत्तमराव पाटील यांच्या स्मारकाशेजारी झाला़ या मेळाव्याला भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुनिल नेरकर, भिमसिंग राजपूत, तेजस गोटे, अ‍ॅड़ अमित दुसाणे, अमित खोपडे, शिरीश शर्मा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते़ मात्र भाजपचे महानगरप्रमुखांसह प्रमुख कार्यकर्त्यांची अनुपस्थिती होती़ मेळाव्याला इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्त्यांचा उदंड प्रतिसाद  मिळाला़ या मेळाव्यात बोलतांना आमदार गोटे म्हणाले की, मी लोकसंग्रामकडून निवडणूक लढेल, विकास आघाडी स्थापन करेल असे काहींना वाटत आहे़ पण माझ्या रक्तारक्तात भाजप भिनलेला असून आमचा झेंडा भाजपचाच राहील, असे गोटे यांनी स्पष्ट केले़ निवडणूक कशी लढवायची हे शिकविण्यासाठी बाहेरच्या शहाण्याची गरज नाही, असे ते म्हणाले़ महापालिकेत सत्ता आल्यास ५३२ किमी रस्त्यांची कामे, दररोज पाणी दिले जाईल असे आमदार गोटे म्हणाले़ एकाही पक्षाची दादागिरी चालू देणार नाही, असा इशाराही आमदार गोटे यांनी दिला़ आमच्याच पक्षाचा एक जण दिल्लीतून अधिकाºयांना रात्रभर फोन करून चौपाटी पाडण्यास सांगत होता, असे म्हणत आमदारांनी स्वपक्षाच्या नेत्यांनाही लक्ष्य केले़ शहरात एका बाबाला केवळ माती टाकायच्या पाट्या माहित असल्याचे आमदार गोटे म्हणाले़ माझ्याकडे इच्छुकांचे ३१७ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी २६१ उमेदवार पदवीधर असल्याचेही गोटे यांनी स्पष्ट केले़ 

 

Web Title: If I rebelled, I will make everyone cool- MLA Anil Gote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.