मास्क न वापरल्यास ५०० रूपये दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 09:57 PM2020-04-12T21:57:58+5:302020-04-12T21:58:33+5:30

शिरपूर/दोंडाईचा : तहसीलदारांनी काढले आदेश

If the mask is not used, fine up to Rs | मास्क न वापरल्यास ५०० रूपये दंड

मास्क न वापरल्यास ५०० रूपये दंड

Next

शिरपूर /दोंडाईचा :कोरोनाच्या अनुषंगाने सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे़ मास्क लावा, घरीच थांबा असे आवाहन देखील प्रशासकीय पातळीवरुन केले जात आहे़ तरी देखील मास्क न लावता शहरात फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे़ त्यांना रोखण्यासाठी ५०० रुपयांचा दंड ठोठावणार असल्याची माहिती तहसीलदार आबा महाजन यांनी दिली़
या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुध्द कारवाई करण्यात येणार आहे. तसेच संबंधितास ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल़ दंडाच्या कारवाईतून जमा होणारा निधी मुख्यमंत्री सहायता कोव्हीड - १९ यासाठी जमा करणे बंधनकारक राहील, असे आदेशात नमूद केले आहे.
दोंडाईचातही आदेश
धुळे जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे या संसर्गापासून बचावासाठी मास्क वापरणे गरजेचे आहे. मास्क न वापरल्यास ५०० रूपये दंड केला जाईल असे अपर तहसीलदार सुदाम महाजन यांनी कळविले आहे.

Web Title: If the mask is not used, fine up to Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे