वेतन आयोग लागू न केल्यास संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 11:40 AM2017-10-06T11:40:44+5:302017-10-06T11:42:03+5:30
एस.टी. कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : एस.टी. कर्मचाºयांना पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग लागू न केल्यास, १७ आॅक्टोबरपासून बेमुदत संप पुकारला जाईल, अशी माहिती महाराष्टÑ एस.टी. कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार संघात झालेल्या या पत्रकार परिषदेला संघटनेचे प्रादेशिक सचिव स्वप्नील गडकरी, धुळे विभागीय सचिव संतोष वाडीले, जळगावचे विभागीय सचिव योगराज पाटील, पोपटराव चौधरी, होते.
हनुमंत ताटे म्हणाले, राज्य परिवहन कर्मचाºयांचे वेतन इतर क्षेत्रातील महामंडळ व राज्य कर्मचाºयांपेक्षा कमी असल्याने, त्यांना उदरनिर्वाह करणे कठीण होत आहे. त्यामुळे संघटनेने एस.टी.कर्मचाºयांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग मिळावा अशी मागणी केली आहे. मात्र प्रशासनाने ही मागणी मान्य करण्यास नकार दिलेला आहे. राज्य शासकीय कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू झाला तरी तो राज्य परिवहन कर्मचाºयांना लागू केला जाणार नाही, असे प्रशासनाने संघटनेला कळविले आहे.
दरम्यानच्या काळात एस.टी.कामगारांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग लागू होईपर्यंत १ एप्रिल १६ पासून हंगामी वाढ करण्यात यावी.
जानेवारी १७ पासून राज्य शासनाने लागू केलेला चार टक्के महागाई भत्ता रा.प. कर्मचाºयांना लागू न केल्यामुळे कामगार कराराचा भंग होत असल्याचे ते म्हणाले.
खाजगी बसेसचा घाट रद्द करावा
दरम्यान महाराष्टÑ एस.टी. कामगार संघटनेचा प्रादेशिक मेळावा सकाळी ११ वाजता सैनिक लॉन्स येथे प्रदेश उपाध्यक्ष गोरखनाथ ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. मेळाव्यात राज्य सरकारी कर्मचाºयांप्रमाणेच रा.प.कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करावा, पदनिहाय वेतनश्रेणी मिळावी, खाजगी बस घेण्याचा घाट रद्द करावा यासह विविध मागण्यांवर चर्चा झाली. तसेच १७ आॅक्टोबर पासून संपावर जाण्याचा निर्णय झाल्याची माहिती देण्यात आली. संघटनेचे जनरल सेके्रेटरी हनुमंत ताटे यांनी मेळाव्याला संबोधित केले. यावेळी संघटनेचे विभागीय अध्यक्ष दीपक पांडव, सुरेश चांगरे, एस.ए.ठाकरे, विलास पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.