प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न न सुटल्यास आंदोलन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 11:43 AM2019-11-04T11:43:53+5:302019-11-04T11:44:10+5:30
महाराष्टÑ पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना : राज्य कार्यकारिणीच्या सभेत राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांचा इशारा
आॅनलाइन लोकमत
धुळे : सर्व शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू, शिक्षकांना मुख्यालयी राहण्याचा अध्यादेश रद्द करावा यासह शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास महाराष्टÑ पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती-संघटना राज्यभर आंदोलन करेल असा इशारा संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील (कोल्हापूर) यांनी आज येथे दिला.
महाराष्टÑ पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीची राज्य कार्यकारिणीची सभा धुळ्यात झाली, त्यावेळी अध्यक्षपदावरून प्रसाद पाटील बोलत होते.व्यासपीठावर राज्यनेते विजय भोगेकर, कोषाध्यक्ष बालाजी पांडगळे (नांदेड), कार्याध्यक्ष बळीराम मोरे (रत्नागिरी), सरचिटणीस हरीश ससनकर, राज्य प्रमुख संघटक भूपेश वाघ (धुळे), महिला राज्याध्यक्षा अलका ठाकरे (चंद्रपूर) राज्य कोषाध्यक्ष रूखमा पाटील (धुळे) आदी उपस्थित होते.
प्रसाद पाटील म्हणाले, शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. याबाबत शासनाकडे पाठपुरावां करण्यात आला. मात्र त्या अद्याप मार्गी लागल्या नाहीत. शिक्षकांचे प्रश्न न सुटल्यास आंदोलन करण्यात येईल. पहिले जिल्हास्तरावर धरणे आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर विधीमंडळावर मोर्चा नेण्यात येईल. दरम्यान आपले प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षकांनी संघटीत व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी विविध ठराव करण्यात आले. त्यात १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रूजू झोल्या कर्मचाऱ्यांना पेशन योजना लागू करावी, सुरक्षा व सोयी सुविधांचा विचार करून सर्व शाळांच्याठिकाणी मुख्यालय बांधून दिल्याशिवाय शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करू नये, ९ सप्टेंबर २०१९चा अध्यादेश रद्द करण्यात यावा, इयत्ता पहिली ते सातवी-आठवीपर्यंतच्या शाळांना विनाअट मुख्याध्यापक पद मंजूर करावे, प्राथमिक शाळेतील सर्वच मुलींना दररोज पाच रूपयांप्रमाणे उपस्थिती भत्ता द्यावा.,नगरपालिका, महानगरपालिका शाळांमधील शिक्षकांचे १०० टक्के वेतन शासनाकडून मिळावे, सर्व शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी आदी ठरावांचा समावेश आहे.
प्रास्ताविक मीरा परोडवाड यांनी केले. तर सूत्रसंचालन रवींद्र देवरे यांनी व आभार भूपेश वाघ यांनी मानले.
सभेला धुळ्यासह नांदेड, रत्नागिरी, चंद्रपूर, कोल्हापूर, वर्धा, गडचिरोली, गोंदीया, वाशिम, अहमदनगर, नंदुरबार येथील जवळपास ५० प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी प्रभाकर चौधरी, उमराव बोरसे, प्रशांत महाले, दीपा मोरे, प्रतिमा वाघ, सुरेखा बोरसे, सुनीता बोरसे आदी उपस्थित होते.