कजर्माफी न दिल्यास मंत्र्यांच्या गाडय़ा रोखणार
By admin | Published: April 24, 2017 11:39 PM2017-04-24T23:39:36+5:302017-04-24T23:39:36+5:30
काँग्रेसचा महामोर्चा : धडगावात एकवटले हजारो आदिवासी बांधव
धडगाव : राज्य आणि केंद्र शासनाने शेतक:यांना कजर्माफ न केल्यास येत्या काळात सत्ताधारी पक्षाचे आमदार व मंत्री यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा आमदार अॅड़ क़ेसी़ पाडवी यांनी दिली़ धडगाव येथे झालेल्या महामोर्चादरम्यान मार्गदर्शन करताना आमदार पाडवी यांनी केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकार हे दलित व आदिवासी विरोधी असल्याचा आरोप केला़ मोर्चादरम्यान उपस्थितांनी पारंपरिक आदिवासी पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सवाद्य अंत्ययात्रा काढून अंत्यसंस्कार केल़े
या महामोर्चाला आमदार क़ेसी़पाडवी, हारसिंग पावरा, विक्रम पाडवी, सुनील पाडवी, धडगाव नगरपंचायत नगराध्यक्षा अहिल्याबाई पावरा, उपनगराध्यक्ष मतीन कुरेशी, जामसिंग पराडके, जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत, माजी सभापती विजयाबाई पावरा, महिला व बालकल्याण सभापती हिराबाई पाडवी, रूपसिंग तडवी, रवींद्र पाडवी, सी़क़ेपाडवी, रामसिंग वळवी, प्रताप वसावे, जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवी, चांद्या पाडवी, लताबाई पाडवी, बुटीबाई पाडवी, योगिता वळवी, गीताबाई पाडवी, थिक्या वसावे, नटवर पाडवी यांच्यासह विविध गावांचे सरपंच, पोलीस पाटील, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह हजारो आदिवासी बांधव उपस्थित होत़े धडगाव शहराच्या विविध भागातून काँग्रेसचे ङोंडे हाती घेतलेले पटके गळ्यात टाकलेले शेकडो कार्यकर्ते सकाळपासून दिसून येत होत़े
धडगाव शहरातील बैल बाजार आमराई येथून सुरू झालेला हा मोर्चा वनविभाग मार्गाने तहसील कार्यालय परिसरात तयार करण्यात आलेल्या सभास्थळार्पयत नेण्यात आला़ तेथून शिष्टमंडळाने तहसील कार्यालयाच्या आवारात तहसीलदार श्याम वाडकर व प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आल़े यानंतर पंचायत समितीसमोर जाहीर सभा घेण्यात आली़ या सभेच्या प्रारंभी याहामोगी माता आणि संविधानाच्या प्रतिचे माल्यार्पण करून पूजन करण्यात आल़े यानंतर दुर्गम भागातून आलेल्या मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत आदिवासी समाजाबाबत फडणवीस सरकार हे दुटप्पी भूमिका घेत असल्याचे आरोप करत आदिवासींच्या हक्कांसाठी यापुढे लढा कायम ठेवला जाईल, असे सांगितल़े (वार्ताहर)